'आदिपुरूष'मधील देवदत्त नागेचं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीशीही आहे खास नातं

Devdutta Nage Relation With Marathi Actress: 'आदिपुरूष' हा चित्रपट येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भुमिकेत दिसणार आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री (Marathi Actress) त्याची मावशी आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 21, 2023, 03:17 PM IST
'आदिपुरूष'मधील देवदत्त नागेचं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीशीही आहे खास नातं title=
फाईल फोटो

Devdutta Nage Relation With Marathi Actress: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतही सिनेकलाकारांच्या नातेवाईकांची काही कमी नसते. एखादा सुपरस्टार हिरो हा दुसऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्याचा जवळचा नातेवाईकही असू शकतो. तुम्हाला माहितीये का की लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागेची (Devdutta Nage Relation) मावशी आहे. तुम्हाला कदाचितच त्यांच्या नात्याबद्दल माहिती नसेल परंतु या अभिनेत्रीनं स्वत:हूनच त्याबद्दल खुलासा केला आहे. देवदत्त नागे 'आदिपुरूष'मध्ये हनुमानाच्या भुमिका करतो आहे.

या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठ्या (Adipurush Trailer) प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांतच या चित्रपटाच्या ट्रेलरला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच या चित्रपटाची उत्सुकता कायम आहे. 

हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटातील हनुमानाची भुमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेची ही अभिनेत्री मावशी आहे. याबद्दल तिनं मध्यंतरी एक पोस्ट शेअर केली होती. ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. सध्या ही पोस्ट परत एकदा व्हायरल झाली आहे. 'लालबाग परळ' या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात अभिनेत्री वीणा जामकरनं भुमिका केली होती. सध्या ती 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेतून महत्त्वाची भुमिका करते आहे. वीणा जामकरनं मध्यंतरी एक इन्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं याविषयी खुलासा केला आहे. 

वीणानं देवदत्तचा 'आदिपुरूष'मधला (Jai Malhar Serial Actor) एक फोटो पोस्ट केला आणि तिनं या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''आज मला एक बात सांगायची आहे... हा हनुमान, ऍक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी.. पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते ' जय मल्हार ' च्या सेटवर..कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही. अतिशय मेहनत, जिद्द आणि त्याच्या शरीरयष्टी सारखीच बलदंड इच्छाशक्ती.. ह्यांच्या जोरावर देवदत्त यशाची शिखरं चढतो आहे आणि चढतच राहिल...! त्याचा खूप अभिमान वाटतो तो फक्त ऍक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र, हुशार असा कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुद्धा! मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत motivate करत राहिला आणि तिथेच न थांबता आता तो माझा mentor आहे!''

हेही वाचा - 'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती पुढे या पोस्टमध्ये म्हणाली की, ''मला काहीही अडचण आली की 'देवा' माझ्या मदतीला हजर असतो.. माझा इतका छान भाचा मला माझ्या लहानपणीच भेटायला हवा होता. म्हणजे लुटूपुटूची 'मावशी - भाच्याची' जोडी गणपतीत खूप खेळली असती. असो. आज सकाळी हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर, अद्भुत शुभेच्छा मिळाल्या...! काय अप्रतिम पोस्टर आहे!!! अजून कोण बनू शकला असता 'हनुमान'?? बालम ( त्याचं घरातलं नाव) We are so so proud of you!!!! तुझ्या जिद्दीला सलाम. तुझी सगळी सगळी स्वप्न पूर्ण होवोत अशी मन:पूर्वक प्रार्थना.. आदिपुरुषसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!'', अशा भावना तिनं या पोस्टमध्ये व्यक्त केल्या होत्या. ही पोस्ट तिनं 6 एप्रिलला पोस्ट केली आहे. सोबतच या पोस्टखाली चाहत्यांच्या (Veena Jamkar Post) कमेंट्सही आल्या आहेत.