अरे रे रे... हे काय घडलं Vidya Balan सोबत; सेलिब्रिटी पार्टीत आला भयानक अनुभव

Vidya Balan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

Updated: Dec 12, 2022, 06:56 PM IST
अरे  रे रे... हे काय घडलं Vidya Balan सोबत; सेलिब्रिटी पार्टीत आला भयानक अनुभव title=

Vidya Balan Oops Moment : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच विद्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, विद्याचा हा व्हिडीओ तिनं शेअर केलेला नाही. (Vidya Balan Viral Video) 

हेही वाचा : Urfi Javed विरोधात पोलिस तक्रार; वकिलांनी केला गंभीर आरोप

विद्याचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्या एका पार्टीतून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. विद्यानं काळ्या आणि गुलाबी रंगाची फ्लोरल साडी परिधान केली आहे. यावेळी तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर देखील तिच्यासोबत होता. दरम्यान, सिद्धार्थला हात मिळवण्यासाठी एक व्यक्ती पुढे येते आणि त्यावेळी चुकून तिच्या साडीचा पधर ओढला जातो. मात्र, ती व्यक्ती वळून विद्याची माफी मागत नाही आणि सरळ पुढे निघून जाते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून अभिनेता सतीश आहे. पुढे व्हिडीओत विद्या तिची साडी सावरताना दिसते. 

पाहा व्हिडीओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विद्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'त्याने माफीही मागितली नाही आणि तो निघून गेला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काय माणूस आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मुद्दाम पधर पकडला.' आणखी एक नेटकरी तिची थट्टा करत म्हणाला, 'टक्कल्या माणसाने दारू पिऊ नये.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तो किती उद्धट माणूस आहे.' तर काही नेटकऱ्यांनी सतीशला प्रचंड ट्रोल केले आहे.  (actress Vidya Balan Oops Moment In Guneet Monga Sunny Kapoor Pre-Wedding Cocktail Party)