आदिनाथ कोठारे-उर्मिला कोठारेमध्ये दुरावा? चाहत्यांनी विचारलं- तुम्ही वेगळे झालात का?

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात गोड कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे. नेहमीच हे कपल त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांना जिजा नावाची गोड मुलगी आहे. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात.

Updated: Jan 5, 2024, 06:12 PM IST
आदिनाथ कोठारे-उर्मिला कोठारेमध्ये दुरावा? चाहत्यांनी विचारलं- तुम्ही वेगळे झालात का? title=

मुंबई :  मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात गोड कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे. नेहमीच हे कपल त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांना जिजा नावाची गोड मुलगी आहे. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात. सगळं काही सुरळीत सुरु असताना मात्र आता या दोघांच्या वेगळ्या होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे  आणि आदिनाथ कोठारे  यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.

नुकताच आदिनाथ कोठारेचा पंचक सिनेमा रिलीज झाला आहे. पंचक या सिनेमात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. माधुरी दीक्षित निर्मीत या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. नुकताच पंचक या सिनेमाचा प्रिमियर सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या दरम्यान या सिनेमाच्या संपुर्ण टीमने प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली होती. याचबरोबर बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनीही पंचक सिनेमाच्या प्रिमियरला हजेरी लावली. असं सगळं असताना याआधी प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र दिसणारे आदिनाथ उर्मिला मात्र यावेळी कुठेच एकत्र दिसले नाही. मात्र आदिनाथसोबत त्याची लाडकी लेक जिजा कोठारे मात्र या कार्यक्रमात तिच्या डॅडासोबत दिसली.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जिजा फोटोसाठी पोज देत असताना आदिनाथ कोठारे तिच्यासाठी पोज देण्यासाठी येतो. मात्र या सगळ्यात त्याच्या चाहत्यांना उर्मिला कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला उर्मिला कुठे दिसत नाही असे प्रश्न विचारले आहेत. एका चाहत्याने कमेंट करत विचारलं आहे की, तुम्ही वेगळे झाले का? ऊर्मिला नाही दिसत कधी पण एकटेच असतां.. तर अजून एकाने विचारलंय, र्मिला पण सोबत असती तर perfect picture झाला असता. Bye the way तर अजून एकाने लिहीलंय, हल्ली उर्मिला का नसते? तुम्ही सेपरेट झालात का? अशा अनेक कमेंट करत आदिनाथला त्याच्या चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत.

२०११ मध्ये या जोडीनं सप्तपदी घेतली. 'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं. या सिनेमामुळे आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी सुरु झाली. यानंतर एक दोन वर्षात दोघांचं 'शुभमंगल' पार पडलं.. या गोड जोडीला एक गोंडस मुलगी आहे. 

सोशल मीडियावरुनदेखील उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं होतं. तसेच एकाच सोसायटीत राहून दोघं वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते. उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. तर सध्या पंचक सिनेमाच्या प्रमोशनमध्येही कुठेच उर्मिला दिसली नाही. त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे उर्मिला आणि आदिनाथच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.