'माझा होशील ना' मध्ये आदित्यच्या व्यक्तिरेखेचा होणार शेवट?

"प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. 

Updated: Jun 26, 2021, 03:57 PM IST
'माझा होशील ना' मध्ये आदित्यच्या व्यक्तिरेखेचा होणार शेवट? title=

प्रेरणा कोरगांवकर, मुंबई | स्मॉल स्क्रिनवरील 'माझा होशील ना' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.. या मालिकेतील प्रत्येक पात्राचा वेगळा फॅन बेस निर्माण झाला. सुरुवातीपासूनच ही मालिका जबरदस्त ड्रामा आणि सस्पेंस क्रिएट करत आली आहे. त्यात आता ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

 नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, "प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे."याआधी गौतमीने शेअर केलेल्या फोटोनंही लक्ष वेधलं आहे. हातात पिस्तुल घेऊन गोळी झाडणाऱ्या सईच्या फोटोने चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. या सगळ्यांची उत्तरं चाहत्यांना मालिकेत मिळतील अशी आशा आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी ही जोडी प्रेक्षकांची वन ऑफ द फेवरेट ऑन स्क्रिन जोडी बनली होती.त्यात आता विराजसच्या भूमिकेचा शेवट होत असल्याचं दाखवण्यात आल्याने पुढचे काही भाग तरी ही जोडी प्रेक्षकांना स्क्रिनवर पाहता येणार नाही, असंच दिसतंय.