मृत्यूच्या आदल्या रात्री...; Aditya Singh Rajput ची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल!

Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंग राजपूत याचा ड्रग्जचे अतिसेवनामुळे त्याचा मुत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अशातच आता त्याची शेवटची इन्टाग्राम पोस्ट (Aditya Singh Rajput Last Instagram Story) व्हायरल होताना दिसत आहे. 

Updated: May 22, 2023, 08:17 PM IST
मृत्यूच्या आदल्या रात्री...; Aditya Singh Rajput ची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल! title=
Aditya Singh Rajput Death Last Instagram Story

Aditya Singh Rajput Last Instagram Story: मनोरंजन क्षेत्रातून धक्कादायक बातमी घेऊन आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) याचा अंधेरी येथील घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला आहे. आदित्यचा मित्र दुपारी त्याला भेटण्यासाठी गेला असता तो बाथरुममध्ये पडलेला दिसला. मित्राला अशा अवस्थेत पाहून मित्रांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ सेक्युरिटी गार्डला बोलवलं आणि त्यांच्या मदतीने आदित्य सिंग राजपूतला रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू (Aditya Singh Rajput Death) झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

आदित्यचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. त्याच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नसून, ड्रग्जचे अतिसेवनामुळे त्याचा मुत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी (Mumbai Police) देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनानंतरच खरं कारण समोर येईल, असं सांगण्यात येतंय. अशातच आता त्याची शेवटची इन्टाग्राम पोस्ट (Aditya Singh Rajput Last Instagram Story) व्हायरल होताना दिसत आहे. 

आणखी वाचा - बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह

आदित्य सिंग राजपूत याने बाल्कनीचा एक फोटो शेअर केला होता, जिथं मित्रांसह पार्टीसाठी टेबल ठेवला दिसतोय. 'संडे फन्डे विथ बेस्टीज' असं कॅप्शन (sunday funde with besties) त्याने फोटोला दिलं होतं. काल रात्री आदित्यने जिवलग मित्रांसह एन्जॉय केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी मित्राचा मृतदेह पहायला मिळाल्याचे सर्वच हादलेत. आदित्यचा मृत्यू ड्रग्जच्या कथित ओव्हरडोजमुळे झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पाहा पोस्ट

आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput Movie) याने 'मैंने गांधी को नही मारा' आणि 'क्रांतिवीर' सारख्या चित्रपटातही काम केलं आहे. पॉप कल्चर (Pop Culture) नावाचा त्याचा स्वत:चा ब्रँड देखील आहे. तो स्वत: कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्याचबरोबर कंबाला इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या टीव्ही शोमध्ये रोहित घोष नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.