९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार !

नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील अजय देवगण आणि काजोल हे कपल साधारणपणे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे. अजय काजोलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 30, 2017, 04:07 PM IST
९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार ! title=

नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील अजय देवगण आणि काजोल हे कपल साधारणपणे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे. अजय काजोलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच अजयने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली होती. अजयने सांगितले की, इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा काजोलसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. 

बॉलिवूडलाईफ.कॉमच्या वृत्तानुसार अजय आणि काजोलचा हा चित्रपट कॉमेडी असून त्यात त्यांचा रोमांस देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर हा कौटुंबिक सिनेमा असून त्यातून एक संदेश देण्यात आला आहे. 

यापूर्वी 'इश्क' आणि 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून अजय-काजोलची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याचबरोबर 'राजू चाचा', 'टूनपुर का सूपरहीरो' आणि 'दिल क्या करे' या चित्रपटात देखील एकत्र काम केले आहे. अजय देवगनचा  'बादशाहो' हा आगामी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात  इलियाना डिक्रूज, इमरान हाशमी, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत.