‘बाहुबली’ला टक्कर देण्यासाठी येतोय भोजपुरी ‘महाबली’

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने भारतीय सिनेमात अनेक रेकॉर्ड तोडले. आता अशात ‘बाहुबली’सोबत टक्कर घेण्यासाठी एक भोजपुरी ‘महाबली’ येत आहे.

Updated: Feb 13, 2018, 03:53 PM IST
‘बाहुबली’ला टक्कर देण्यासाठी येतोय भोजपुरी ‘महाबली’ title=

मुंबई : गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने भारतीय सिनेमात अनेक रेकॉर्ड तोडले. आता अशात ‘बाहुबली’सोबत टक्कर घेण्यासाठी एक भोजपुरी ‘महाबली’ येत आहे.

५ भाषांमध्ये होणार रिलीज

‘वीर योद्धा महाबली’ चा पहिला लूक नुकताच समोर आलाय. या सिनेमात भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ ‘महाबली’च्या भूमिकेत दिसेल. भोजपुरी कलाकारांचा हा सिनेमा केवळ भोजपुरी नाहीतर आणखीही ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. भोजपुरीसोबतच हा सिनेमा हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलगुमध्येही रिलीज होणार आहे. ‘वीर योद्धा महाबली’ सिनेमाचं दिग्दर्शन इकबाल बख्श करणार आहे. 

फर्स्ट लूक रिलीज

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटरवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याने ट्विट केलं की, ‘वीर योद्धा महाबलीचा फर्स्ट लूक. दिनेश लाल यादव. पाच भाषांमध्ये तयार होत आहे’.

निरहुआ आणि आम्रपाली सोबत

भोजपुरी सिनेमात निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपालीची जोडी फारच हिट आहे. या सिनेमात सुद्धा निरहुआसोबत आम्रपाली खूपच वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या दोघांसोबतच या सिनेमात सुशील सिंह, एजाज खानसारखे स्टार्स दिसणार आहेत. आता हा भोजपुरी ‘महाबली’ ‘बाहुबली’ला टक्कर किती टक्कर देईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.