करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल

करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असून तिही आपला बेबी बम्प लपवतं आहे अशा चर्चांना जोरात उधाण आलं होतं. 

Updated: Oct 12, 2022, 03:37 PM IST
करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल  title=

Aditi and Mohit Mallik Photos: सध्या बॉलीवूडमध्ये बेबी बम्प हा शब्द खूप ट्रेण्ड होतो आहे. अभिनेत्रींच्या प्रेग्नंन्सीबद्दल सध्या तुफान चर्चा होताना दिसते आहे. मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्याही प्रेगंन्सीच्या चर्चांना कोण उधाण आलं होतं. त्यातून बेबी बम्पच्याही चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. आता या नव्या अभिनेत्रीच्या बेबी बम्पवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (after katrina kaif and kareena kapoor this actress hides baby bump netizens reacts on photos)

करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असून तिही आपला बेबी बम्प लपवतं आहे अशा चर्चांना जोरात उधाण आलं होतं. परंतु त्यावर मग करीना कपूरनं मौन सोडलं होतं. त्यानंतर मध्यंतरी कतरिना कैफच्याही चर्चांना उधाण आलं होतं. परंतु आता ही अभिनेत्रीही या चर्चांमध्ये अडकली आहे तिची नावं आहे अदिती शिरवाईकर. 

अदिती शिरवाईकर ही 'कुल्फी कुमार बाजेवाला' सारख्या मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता मोहित मलिकची पत्नी आहे. त्या दोघांनी 2010 मध्ये अदिती शिरवाईकरसोबत लग्न केलं. तेव्हापासून या दोघांची गणना टीव्ही टाउनच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जातं आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांच्या घरी नव्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. परंतु आता अदिती शिरवाईकर पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहित मलिक आणि अदिती शिरवाईकर त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी एक्साईडेड आहेत अशा बातम्या पसरायला लागल्या आहेत. अदितीनं नुकत्याच एका लहान मुलाला जन्म दिला आहे. ज्याचं नावं त्यांनी एकबीर असं ठेवलं आहे. 

सध्या अशी बातमी फिरते आहे की अदिती आणि मोहित दुसऱ्यांदा पालक होणार असून अदिती तीन महिन्यांची प्रेग्नंन्ट आहे. परंतु ही फक्त अफवा असल्याचंही म्हटलं जात आहे कारण याबाबत त्या दोघांनी अजूनही कसली अधिकृत घोषणा दिलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

अदितीने 27 एप्रिल 2021 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. ही गुडन्यूज तिनं सोशल मीडियावरून शेअर केली होती. आपल्या बाळाचे फोटोजही ती नेहमीच इन्टाग्रामवर शेअर करत असते. फोटोंसोबत तिचे अनेक व्हिडीओजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मोहित हा टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय कलाकार आहे. रोहित शेट्टीच्या स्टंट शो 'खतरों के खिलाडी 12' मध्ये तो दिसला होता. मोहितनं अनेक मालिकांमधून कामं केली आहेत. तर अदिती शिरवाईकर ही  मराठी अभिनेत्री असून तिनं हिंदी मालिका - चित्रपटांमधून कामं केली आहे. विशेष म्हणजे श्रीयुत गंगाधर टीपरे या मालिकेतूनही तिनं छोटा रोल केला होता.