सिद्धार्थच्या निधनानंतर अखेर एक्स गर्लफ्रेंडनं मागितली माफी

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्या लव्ह अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती.

Updated: Sep 3, 2021, 10:48 AM IST
सिद्धार्थच्या निधनानंतर अखेर एक्स गर्लफ्रेंडनं मागितली माफी title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्या लव्ह अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. बिग बॉस 13 च्या घरात दोघांमध्ये झालेली भांडण सर्वाधिक चर्चेत होती. रश्मीने सिद्धार्थवर चहा फेकणे, सिद्धार्थ रश्मीला "अशी मुलगी" म्हणणे, बिग बॉसच्या घरात जे घडले ते जवळजवळ सर्व त्यांच्याभोवती फिरत होते. आता सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतल्यानंतर रश्मी देसाई देखील दुःखी झाली आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबरला वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनंतर रश्मीने एक हृदयद्रावक इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर ती तिच्या आईसोबत सिद्धार्थच्या घरीही गेली.
रश्मीची भावनिक पोस्ट केली.

आता रश्मी देसाईने सिद्धार्थ शुक्लासोबत घालवलेल्या काही क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रश्मी आणि सिद्धार्थचे आंबट-गोड भांडणाचे नाते स्पष्टपणे दिसत आहे. फोटो शेअर करताना रश्मीने लिहिले - कधी कधी आयुष्य गुंतागुंतीचे बनते. पण आज एक आठवण आहे की आपण सर्वात मोठे आहोत.शब्दांना आता अर्थ नाही. हे लिहिताना माझे हृदय तुटत आहे- शांतपणे विश्रांती घे, सिद्धार्थ शुक्ला...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

रश्मी देसाई आणि सिद्धार्थने दिल से दिल तक या शो मध्ये काम केले होते. त्यावेळी त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. मात्र, नंतर दोघांमध्ये खूप भांडणे झाल्याच्या बातम्या समोर आल्या. दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.