Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Sep 9, 2022, 10:15 AM IST
Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. आलियानं आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून ते चित्रपट हिट ठरले आहेत. आलियाचं नाव आज यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. आलियाला मिळणाऱ्या ऑफर विषयी अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायनं (Aishwarya Rai Bachchan) वक्तव्य केलं होतं. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा : Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक

ऐश्वर्याचा चार वर्ष जुना म्हणजेच 2018 चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आलियाच्या यशाविषयी बोलताना दिसत आहे. ऐश्वर्या तिच्या 'फन्ने खान' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्यानं आलिया भट्टच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगितलं. तिला करण जोहरचा पाठिंबा मिळाला आहे. कारण त्यानं आलियाला चित्रपटात लॉन्च केलं आहे, असे ऐश्वर्या म्हणाली.

आणखी वाचा : कोण होणार कतरिनाची वहिनी? Koffee With Karan 7 मध्ये नाव समोर

'आलिया ही उत्तम अभिनेत्री असेल, मला तिला सांगायचं आहे की तिनं पुढे जावं, हे चांगलं आहे की तिला सर्व काही माहित आहे पुढे जाऊन सर्व गोष्टी आनंदानं करा. करणनं तिला सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तिला कोणतीही अडचण आली नाही आणि तिनं अत्यंत आरामात काम केलं आहे', असे ऐश्वर्या म्हणाली. पुढे ऐश्वर्या हे देखील म्हणाली की, 'आलियासमोर ऑफर्सची लाइन असते.' (Aishwarya Rai Bachchan Talked About Alia Bhatt Success Said Karan Johar supported her Video Viral) 

आणखी वाचा : Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!

आणखी वाचा : 'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील
दरम्यान, ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपट 'पोन्नियन सेल्वन'मुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट आज 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.