बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर

ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दरवेळेप्रमाणे सहभागी होणार आहे. मात्र यावेळी तिची अवस्था बघून चाहत्यांना धक्का बसत आहे. 

Updated: May 16, 2024, 04:19 PM IST
बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर title=

मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ सध्या सुरु आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही बॉलिवूड अभिनेत्री  ऐश्वर्या राय कान्सचा रेड कार्पेट गाजवण्यासाठी सज्ज आहे. नुकतीच ऐश्वर्या रात्री उशिरा एअरपोर्टवर तिची लेक आराध्यासोबत स्पॉट झाली. ऐश्वर्या आणि आराध्या कान्ससाठी रवाना झाली आहे. पापाराझींनी तिला एअरपोर्टवर स्पॉट केलं मात्र ज्या अवस्थेत ती दिसली त्यामुळे तिची चिंता वाढली आहे. 

ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दरवेळेप्रमाणे सहभागी होणार आहे. मात्र यावेळी तिची अवस्था बघून चाहत्यांना धक्का बसत आहे. यावेळी ऐश्वर्याच्या हाताला प्लास्टर पाहिल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ऐश्वर्याची अशी पाहून चाहते हैराण झाले आहेत. मात्र यानंतर आता अभिनेत्रीच्या हाताला का दुखापत झाली हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे.

आराध्याचा आधार घेऊन चालताना दिसली
नुकत्याच ऐश्वर्या आणि आराध्या मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. यावेळी तिच्या खांद्यावर स्लिंग घातल्याचं दिसलं. हे पाहून तिचे चाहते काळजीत पडले. ऐश्वर्या रायच्या डाव्या बाजूला फ्रक्चर असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओव्दारे दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत ऐश्वर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. यावेळी आराध्या ऐश्वर्याचा आधार घेऊन चालताना दिसली.ऐश्वर्याला गंभीर दुखापत झाली आहे तरिही ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसत आहे. तिने ब्लू कलरची लॉंग कोट आणि ब्लॅक पँन्ट परिधान केली आहे. तिने पापाराझींनाला पाहून स्माईल देत पोज दिल्या. तर आराध्याने ब्लू हुडी आणि ब्लक लॉअर मध्ये दिसली 

आईला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे ऐशच्या हाताला प्लास्टर आहे. त्यामुळे आराध्या तिच्या आईला सपोर्ट करताना दिसली. यावेळी आराध्याने तिच्या आईची बॅगही कॅरी केली. त्यामुळे चाहते आराध्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

२००२ साली ऐश्वर्या पहिल्यांदा कान्समध्ये सहभागी झाली होती. पहिल्यांदा ऐश्वर्या कान्समध्ये साडीत दिसली होती. त्यावेळी तिच्यासोबत देवदास सिनेमातील को-स्टार शाहरुख खानदेखील दिसला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे गेली २२ वर्ष ऐश्वर्या या कार्यक्रमात सहभागी होतेय आणि प्रत्येकवेळी ती वेग-वेगळ्या अंदाजात दिसतेय. ऐश्वर्या राय व्यतिरिक्त यावेळी कान्स फिल्म फेस्टिवरमध्ये उर्वशी ढोलकिया, कियारा आडवाणी, शोभिता धुलिपाला, अदिति राव हैदरी आणि जॅकलीन फर्नांडिसदेखील सहभागी होणार आहेत.