ऐश्वर्याचा प्रदर्शित न होवू शकलेला चित्रपट, व्हिडिओ व्हायरल

एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

Updated: Apr 8, 2020, 04:06 PM IST
ऐश्वर्याचा प्रदर्शित न होवू शकलेला चित्रपट, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : आपल्या घायाळ अदांनी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्याच्या चित्रपटातील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मुळात तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर कधी दाखल झालाच नाही.  १९९७ साली प्रदर्शनाच्या मार्गावर असणाार ‘राधेश्याम सिताराम’चित्रपटातील हा व्हिडिओ आहे. अनीस बाझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. चित्रपटात ऐश्वर्यासोबत सुनील शेट्टीची मुख्य भूमिका होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I can't take my eyes off her#AishwaryaRai on the sets of incomplete movie Radheshyam Sitaram in 1997. Cr @movietalkies @aneesbazmee @suniel.shetty #QueensBollyVideo. #AishwaryaRaiBachchan #sunielshetty #kajol #ranimukerji #priyankachopra #deepikapadukone #sonamkapoor #shilpashetty #sonakshisinha #shraddhakapoor #saraalikhan #kanganaranaut #jacquelinefernandez #missworld #missworld1994 #kareenakapoor #aliabhatt #AbhishekBachchan #aaradhyabachchan

A post shared by Queens Of 

परंतू काही कारणांमुळे हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येवू शकला नाही. व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने साजशृंगार तिच्यावर फार उठावदार दिसत आहे. चित्रपटाच्या गाण्याच्या शूटींगसाठी ही तयारी केली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ऐश्वर्याच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘गुरू’, ‘देवदास’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे.