Ajay Devgn Injured : अजय देवगनचा अपघात; अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

अभिनेता अजय देवगनच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी समोर येतेय. सिंघम फेम अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

Updated: Dec 4, 2023, 12:32 PM IST
 Ajay Devgn Injured : अजय देवगनचा अपघात; अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत title=

मुंबई : अभिनेता अजय देवगनच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी समोर येतेय. सिंघम फेम अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार  अजय रोहित शेट्टीची अपकमिंग सिनेमा 'सिंघम अगेन'चं मुंबईत फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरु होतं याचदरम्यान एका एक्शन सीन दरम्यान अभिनेत्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अभिनेत्याने अपघातानंतर ब्रेक घेवून पुन्हा  एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. 

काही वेळासाठी घेतला ब्रेक
मिड डे रिपोर्टनुसार अजय देवगन एक कॉम्बॅट सीक्वेंस शूट करत होता. तेव्हा चुकून अभिनेत्‍याच्‍या चेहर्‍यावर आघात झाला, त्‍यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. काही वेळासाठी अभिनेत्याने शूटिंमधून ब्रेक घेतला होता मात्र यानंतर अभिनेत्याने आरामानंतर शूटिंगला सुरुवात केली आहे.

अजयशिवाय हे कलाकारही दिसणार आहेत 
रोहित शेट्टीचा अपकमिंग सिनेमा सिंघम अगेनमध्ये अजय देवगन व्यतिरीक्त अनेक सेलिब्रिटी लीड रोलमध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त करीना कपूर, दीपिका पादुकोण, शिल्पा शेट्टी, टाइगर श्रॉफ,सोनू सूद, प्रकाश राज, फरदीन खान  जैकी श्रॉफ आणि रणवीर सिंह सुद्धा झळकणार आहेत.अभिनयापासून वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या अनेक निर्णयांसाठी अभिनेता अजय देवगन ओळखला जातो. तो सहसा सोशल मीडियावर फार काही पोस्ट करत नाही. बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगन आजकाल आपल्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2024 मध्ये रिलीज होणार सिनेमा
'सिंघम अगेन' हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचे या आधी अनेक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणि सगळ्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रोहित शेट्टीच्या आत्तापर्यंतच्या रिलीज झालेल्या सिनेमामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त एक्शन सीन पाहायला मिळाले आहेत. आणि प्रत्येक भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे रोहितने अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  अजय देवगणबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा 'भोला' चित्रपटात दिसला होता. त्यात अजयशिवाय तब्बूही होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.