अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून 'हा' चिमुकला आज सुपरस्टार अभिनेता, दोन लग्न आणि तब्बूसोबत 15 वर्ष अफेयरची चर्चा

Entertainment News : अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. आज तो सुपरस्टार असून त्याचे दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत कमाल करत आहेत. या अभिनेत्याचं लव्ह लाइफही रंजक आहे. पहिली पत्नी असताना दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता. तर तब्बू सोबतचही 15 वर्ष अफेयरची चर्चा रंगली होती. 

नेहा चौधरी | Updated: Aug 29, 2023, 08:48 AM IST
अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून 'हा' चिमुकला आज सुपरस्टार अभिनेता, दोन लग्न आणि तब्बूसोबत 15 वर्ष अफेयरची चर्चा  title=
akkineni nagarjuna love story amala akkineni love life affair tabu unknown facts bollywood gossip entertainment news

Nagarjuna Unknown Facts : दक्षिण आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करणारा सुपरस्टार आहे हा फोटोमधील चिमुकला. त्याची दुसरी बायकोदेखील कधी काही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. शिवाय आज त्याचे दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीमधील नावाजलेले आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. हा अभिनेत्याचा आज 64 वा वाढदिवस (Nagarjuna Birthday) आहे. त्याचा फिटनेसकडे पाहून अनेकांना हेवा वाटतो. हा अभिनेता आहे अक्किनेनी नागार्जुन. (Akkineni Nagarjuna) 

मनीषा कोईरालासोबतचा तू मिले दिल खिले हे 90 च्या दशकातील गाणं आजही तरुणांच्या हृदयाचे ठोके वाढवतं. 'मेरी जंग', 'वन मॅन आर्मी' या चित्रपटांनी बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना त्याने कडवी टक्कर दिली आहे. नागार्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.  (akkineni nagarjuna love story amala akkineni love life affair tabu unknown facts bollywood gossip entertainment news)

अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात एन्ट्री !

नागार्जुन ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना त्यांनी अभिनय क्षेत्राला करिअर म्हणून निवडलं. खरं तर चित्रपट कुटुंबातील नागार्जुनने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1967 मध्ये आलेल्या 'सुदीगुंडालू' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे वडील मुख्य भूमिकेत होते. नागेश्वर राव अक्किनेनी हे देखील त्यांच्या काळातील मोठे अभिनेते होते.  त्यांना एनआरए म्हणूनही ओळखले जायचे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नागार्जुनने 1986 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली. 'कॅप्टन नागार्जुन' (1986), 'मंजू' (1986), 'किराई दादा' (1987), 'गीतांजली' (1989), 'किलर' (1991), 'गोविंद गोविंद' (1994), 'कॅप्टन नागार्जुन' (1994) सारखे अनेक चित्रपट गाजले. त्याशिवाय 'शिवा' (1990), 'खुदा गवाह' (1992), 'क्रिमिनल' (1995), 'मिस्टर बेचारा' (1995) या बॉलिवूड चित्रपटांमधूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली.  त्यांना किंग ऑफ टॉलवूड म्हणून ओळखलं जातं. 

 

नागार्जुनची लव्ह लाइफ गाजली!

चित्रपटातील अभिनयासोबत त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप गाजलं. ज्येष्ठ चित्रपट निर्माते डॉ. डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबती यांच्याशी पहिलं लग्न झालं होतं. लक्ष्मी दग्गुबती ही चित्रपट निर्माते आणि अभिनेते व्यंकटेश सुरेश बाबू यांची बहीण आहे. पहिल्या बायकोकडून त्यांना 1984 मध्ये त्यांना मुलगा झाला. नागा चैतन्य आज तोही वडिलांसारखं टॉलीवूड आणि बॉलीवूड धुमाकूळ घालत आहे. 

नागार्जुनचं पहिलं लग्न मोडलं ते अभिनेत्री अमला अक्किनेनी हिच्याशी जवळीक वाढल्यामुळे असं बोलं जातं. 6 वर्षांमध्ये पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन त्यांनी अमला हिच्याशी लग्न केलं. त्यांनाही एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे नागा चैतन्य. आज हे नावावही अख्खा चित्रपटसृष्टीत नावाजलेलं आहे. चैतन्यने अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं पण ते आता वेगळे झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तब्बूसोबत होतं अफेयर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जातो की, दुसऱ्या लग्नानंतरही नागार्जुन तिसऱ्यांदा एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता. बॉलिवूडमधील अभिनेत्री तब्बूसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. या दोघांचं नातं तब्बल 15 वर्षे होतं असं म्हणतात. खरं तर, नागार्जुनचे तब्बूवर खूप प्रेम होते, पण त्याला अमलासोबतचं लग्न मोडायचं नव्हतं. म्हणून दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले, असं म्हटलं जातं. 

 

हेसुद्धा वाचा - दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून 20 वर्ष राहिला हा अभिनेता, 3 वर्षे निर्मात्यांभोवती फिरला, हॉटेल मॅनेजर झाला अन् त्या एका फोनने...

 

हॉटेलचा मालक आणि बॅडमिंटनशी संबंध!

अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' शो तेलगूमध्ये नागार्जुन होस्ट करतो. शिवाय त्याचा खेळाशीही संबंध आहे. इंडियन बॅडमिंटन लीगमधील मुंबई मास्टर्स या संघाचे ते मालक असून सुनील गावस्कर त्यांचे भागीदार आहेत. तर महेंद्रसिंग धोनीसह नागार्जुनचेही माही रेसिंग टीम इंडियामध्ये शेअर्स आहेत. एवढंच नाही तर नागार्जुन यांचं हैदराबादमध्ये एन-ग्रिल नावाचं रेस्टॉरंट आहे. त्यासोबतच त्यांचं एक चायनीज रेस्टॉरंटही आहे ज्याचं नाव An Asian आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महागड्या कार संग्रह

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नागार्जुनला कारचा शौकीन आहे. त्यांच्याकडे Audi A7, Range Rover Evoque, Mercedes A-Class, BMW 7 Series आणि अनेक लक्झरी कार  आहेत.