अभिनेत्री झरीन खानचा विनयभंगाचा आरोप, मेकर्सचा नकार

या अभिनेत्रीला साथ देण्याचे सोडून फिल्ममेकर्स झरीनवर नाराज झाले आहेत. 

Updated: Nov 22, 2017, 10:12 AM IST
अभिनेत्री झरीन खानचा विनयभंगाचा आरोप, मेकर्सचा नकार title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘अक्सर २’ सिनेमाची अभिनेत्री झरीन खानने खुलासा केला होता की, दिल्लीत सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. यामुळे तिला बराच त्रास झाला होता. पण आता या अभिनेत्रीला साथ देण्याचे सोडून फिल्ममेकर्स झरीनवर नाराज झाले आहेत. 

बॉलिवूड लाईफ डॉट कॉम वेबसाईटने दिलेल्या वॄत्तानुसार, झरीनसोबत झालेल्या गैरवर्तनाने ती चांगलीच नाराज आहे. झरीने आरोप केला की, तिला टीमकडून मिसलीड करण्यात आलं. इतकंच नाही तर तिला कमी सुरक्षा देण्यात आल्याने तिला अडचणीला सामोरं जावं लागलं. पण झरीनच्या या तक्रारीवर फिल्ममेकर्स खुश नाहीयेत. फिल्ममेकर्सच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दिल्लीतील इव्हेंटमध्ये असे काहीच झाले नाही. 

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार सूत्रांचं म्हणनं आहे की, ‘झरीन खान आणि तिची टीमला इव्हेंटच्या दोन दिवसआधीच इव्हेंटची पूर्ण माहिती देण्यात आली होती. झरीनने दिलेला शब्द पाळला नाही आणि तिने पत्रकार परिषद सोडली. झरीनने सिनेमाचं प्रमोशनही पूर्ण केलं नाही. याचा फिल्ममेकर्सना मोठं फटका बसला. झरीनचा विनयभंग झाल्याची घटना अजिबात खरी नाहीये. कारण ती नखरे दाखवत आधीच इव्हेंटमधून निघून गेली होते’.