द माफिया क्वीन ऑफ मुंबई - गंगुबाई काठियावाडी फर्स्ट लूक

‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाळी निर्मित गंगूबाई काठियावाडी या सिनेमात अभिनेत्री

Updated: Jan 16, 2020, 12:32 AM IST
द माफिया क्वीन ऑफ मुंबई - गंगुबाई काठियावाडी फर्स्ट लूक  title=

मुंबई : ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाळी निर्मित गंगूबाई काठियावाडी या सिनेमात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकतेय.. नुकताच या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारीत गंगुबाई काठियावाडी या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाबाबतची उत्सूकता वाढली आहे.

संजय लीला भंसाळी निर्मित या सिनेमात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून नुकताच या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आलाय.. हा सिनेमा ११ सप्टेंबर २०२० ला रिलीज होत आहे. 

गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. 

हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमातील आलियाच्या फर्स्ट लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. 

संजय लीला भंसाळीचा हा सिनेमा आलियाच्या करिअरमधील एक मायलस्टोन ठरेल असंच दिसतंय.. या सिनेमाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे. 

या सिनेमाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी प्रथम प्रियांका चोप्राला दिग्दर्शकांची पसंती असल्याचं सांगण्यात येत होतं. आता आलियासोबत कोणता कलाकार स्क्रीन शेअर करणार हे अजून गुलदस्त्यात आहे..