आलियाला हवीत‌ 'इतकी' मुलं, खास मैत्रिणीचा खुलासा

आलियाला भविष्यात किती मुलं हवी आहेत या प्रश्नाचं उत्तर आलियाची मैत्रीण आकांशाने बिनचूकपणे दिलं आहे.

Updated: Aug 5, 2019, 12:16 PM IST
आलियाला हवीत‌ 'इतकी' मुलं, खास मैत्रिणीचा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या लग्नाच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. पण सध्या ती आणि तिची खास मैत्रीण आकांशा रंजन यांच्यामधील संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. फ्रेंडशिप डेचं औचित्य साधत आलियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर त्यांच्या मैत्रीत असलेल्या गोडव्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोघी एक खेळ खेळताना दिसत आहेत. या खेळामध्ये त्या दोघी एकमेकींना किती चांगल्याप्रकारे ओळखतात याचा खुलासा करताना दिसत आहेत. आलियाला भविष्यात किती मुलं हवी आहेत या प्रश्नाचं उत्तर आलियाची मैत्रीण आकांशाने बिनचूकपणे दिलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघी मैत्रीणिंचा मजेदार खेळ रंगत असल्याचा. आकांशाने आलियाला २ मुलं हवे असल्याचे सांगितले आहे, तर दोघींच्या आवडतीचं फिरण्याचं स्थळ लंडन आहे. अशा अनेक गोष्टींचा खुलासा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. 

आलियाने 'सडक २' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे ती वर्षाखेरीस 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.