'मर्द'च्या सेटवर थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, 'या' आजारामुळे घशाखाली उतरत नव्हतं पाणी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन यांचा 'मर्द' या चित्रपटाच्या सेटवर जीव थोडक्यात वाचला होता.  

दिक्षा पाटील | Updated: Oct 11, 2023, 11:58 AM IST
'मर्द'च्या सेटवर थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, 'या' आजारामुळे घशाखाली उतरत नव्हतं पाणी title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि टीनू आनंद यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. टीनू आनंद यांनी फक्त अभिनय केला नाही तर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले. शहंशाह चित्रपटात टीनू आनंद यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. पण एकदा असं झालं की सेटवर अमिताभ बच्चन हे मरता मरता वाचले होते. त्यांना एक गंभीर आजार झाला होता. त्याविषयी त्यांनी कोणाला सांगितले देखील नव्हते. टीनू आनंद यांनी याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. 

'मर्द' चित्रपटाच्या सेटवर घडला होता हा प्रकार!

टीनू आनंद यांनी सांगितले की अमिताभ हे मायस्थेनिया ग्रेविससारख्या गंभीर आजारानं ग्रस्त होते. टीनू आनंद यांनी याविषयी रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. अमिताभ बच्चन हे 'मर्द' या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. तेव्हा टीनू आनंद त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ही शूटिंग मैसूरमध्ये सुरु होती आणि अमिताभ बच्चन यावेळी जखमी झाले होते. या कारणामुळे अमिताभ यांना बेंगलुरु शिफ्ट करण्यात आले. जेव्हा टीनू आनंद तिथे पोहोचले तेव्हा अमिताभ यांनी त्यांना बसायला सांगितलं आणि म्हणाले की तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. 

अमिताब यांना झाला होता हा आजार! 

अमिताभ बच्चननं टीनू आनंद यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शहंशाह चित्रपटाचं शूट कॅन्सल केलं. कारण मला Myasthenia Gravis हा आजार झाला आहे. या आजारात रुग्णाच्या मासपेशींवर खूप परिणाम होतो. अमिताभ म्हणाले की मर्द या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ब्रेक घेऊन ते पाणी पित होते. पण ते पाणी त्याच्या गळ्यात अडकले. तर त्यावेळी त्यांच्या ब्रेनपर्यंत हा सिग्नल पोहोचलास नाही की पाणी घश्याच्या खाली जायला हवं. त्यांना कळलंच नाही की काय करायला हवं. यामुळे अमिताभ बच्चन यांचा श्वासही अडकला आणि हा प्रसंग जीवावर बेतला. अमिताभ यांनी यावेळी सांगितलं की जवळपास त्यांचा मृत्यूच झाला होता कारण त्यांना श्वास घेता येत नव्हता. (थोडक्यात अमिताभ हे मरता मरता वाचले)

हेही वाचा : रणबीरनंतर आता संजय दत्त, सुनील शेट्टी ED च्या रडावर; जाणून घ्या कलाकारांचं नेमकं काय चुकलंय

एक वर्ष घ्यावा लागला होता ब्रेक! 

आनन-फाननमध्ये अमिताभ बच्चन यांना त्वरीत रुग्णालयात येण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना कंप्लीट आराम करण्यास सांगितले. डॉक्टरांनी अमिताभ यांना हे देखील सांगितलं की ते पुन्हा अभिनय करू शकणार नाही. आजारामुळे अमिताब बच्चन यांना अभिनयातून एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला होता.