KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...

Amitabh Bachchan Sharabi : अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसत आहेत. तर त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन 'घूमर' या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होत्या. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2023, 01:49 PM IST
KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि... title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan Sharabi : छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत असणारा शो म्हणजे  'केबीसी'. 'केबीसी' चं आता 15 वं पर्व सुरु झालं आहे. या शोचे सुत्रसंचालन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. 14 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. तर काल त्यांच्यासमोर हॉटसीटवर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्याचा 'घूमर' हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला.  यावेळी अभिषेक त्याची सहकलाकार सैयामी खेर आणि दिग्दर्शक आर बाल्की यांच्यासोबत पोहोचली होती. तर यावेळी बिग बी अचानक स्टेजवर 'शराबी' च्या रुपात दिसले. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर अभिषेक बच्चन होता. तर दुसरीकडे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन त्यांच्या 1984 साली प्रदर्शित झालेल्या 'शराबी' या चित्रपटाची प्रेक्षकांना आठवण करून देण्यास सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांना शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांना डबल धमाका मिळाला आहे. खरंतर जेव्हा अभिषेक, सैयामीसोबत तिथे पोहोचला तेव्हा नेहमीच शिस्तप्रिय सगळ्यांशी गोड बोलणारे अमिताभ अचानक नशेत त्यांच्यासमोर आले. अमिताभ हे कोणत्या मद्यपी केलेल्या व्यक्तीसारखे वागत होते. असे अमिताभ पाहून अनेकांना आश्चर्य झाले. मात्र, त्यामागे एक वेगळाच ट्वीस्ट होतात. खरंतर, अमिताभ बच्चन फक्त आणि फक्त सेटवर नशेत असलेल्या व्यक्तीचा अभिनय करत होते. अशा परिस्थितीत अमिताभ त्यांचे डायलॉग्स बोलतात आणि ते पाहून हसून-हसून वेडे झाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शोच्या या एपिसोडनं सगळ्यांचे भरभरून मनोरंजन केले. अमिताभ यांचा हा लूक पाहिल्यानंतर अनेकांना शराबी चित्रपटाची आठवण झाली. 'घूमर' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट काल 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैयामीखेर, अंगद बेदी आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

हेही वाचा : पंकज त्रिपाठी यांचा मुलगा पाहू शकत नाही 'ओएमजी 2', कारण सांगत म्हणाला...

दरम्यान, अमिताभ यांच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'ऊंचाई' या चित्रपटात दिसले होते. याशिवाय 'गुडबाय' या चित्रपटांमध्ये दिसले होते. आता त्यांच्याकडे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा  'गणपत' हा चित्रपट आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबतचा 'कल्‍क‍ि 2898 AD' हा चित्रपट आहे. तर त्याशिवाय 'द इंटर्न' चा रिमेक देखील आहे.