Amitabh Bachchan यांचा Abhishekला मोठा धक्का; संपत्तीबाबत मोठा निर्णय...

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा संपत्तीसंदर्भात (Property) खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीटही केलं आहे. या निर्णयानंतर अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) मोठा धक्का बसल्याचं बोलं जातं आहे.

Updated: Sep 5, 2022, 12:17 PM IST
Amitabh Bachchan यांचा Abhishekला मोठा धक्का; संपत्तीबाबत मोठा निर्णय... title=
amitabh bachchan says son abhishek bachchan not my successor tweets viral gossips news

Amitabh Bachchan: महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलीवूडसह (Bollywood) जगात सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. बच्चन कुटुंबासंदर्भात कुठलीही गोष्ट असो लोकांना ती जाणून घ्यायला खूप आवडतं. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत बिग बी (Big B) यांचं नाव घेतलं जातं. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा संपत्तीसंदर्भात (Property) खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीटही केलं आहे. या निर्णयानंतर अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) मोठा धक्का बसल्याचं बोलं जातं आहे.

बिग बींचा निर्णय, अभिषेकला धक्का?

अमिताभ यांची संपत्ती किती आहे आणि त्यांचा वारसदार कोण होणार यासंदर्भात नेटकरी फार उत्सुक असतात. अशात काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट (tweet) केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. त्यांचा या ट्वीटने नेटकऱ्यांचे डोळे उंचावले होते.

काय म्हणाले बिग बी

या ट्वीटमध्ये अमिताभ यांनी अभिषेक बच्चनचे (Abhishek Bachchan) दोन वेगवेगळे फोटो कोलाज करुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांचा वडिलांची कविता लिहली आहे. त्यात ते म्हणतात की, माझा मुलगा माझा वारसा होणार नाही,जो माझा वारस होईल तो माझा मुलगा असेल. अभिषेक तू माझा खरा वारसदार आहेस, माझा गर्व आहेस. माझा आनंद आहे, असं ट्वीट केलं आहे. 

अमिताभ बच्चन यांना श्वेता नंदा (Shweta Bachchan) ही लाडकी लेकही आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांची संपत्ती कोण कोण वाटेकरी असेल हे नेटकरांना कायम जाणून घ्यायचं आहे. मात्र आता या पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा खरा वारसदार अभिषेक असल्याचं दिसून येतं आहे.