अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत स्माईल करणारा 'हा' गोड मुलगा कोण? ओळखलंत का...

Amitabh Bachchan Old Photo: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची. त्यांनी सध्या एक फोटो शेअर केला आहे ज्यात एक लहान मुलगा त्यांच्याकडे फारच क्युट स्माईल करत हसतो आहे. तुम्ही ओळखलंत का की हा अभिनेता आहे तरी कोण? 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 5, 2023, 03:38 PM IST
अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत स्माईल करणारा 'हा' गोड मुलगा कोण? ओळखलंत का... title=
amitabh bachchan shares a cute photo with abhishek bachchan latest entertainment news marathi

Amitabh Bachchan Old Photo: अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही फार एक्टिव असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या त्यांनी आपला एक खूप जुना फोटो शेअर केला आहे. या त्यांच्या फोटोवरून त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आह. यावेळी त्यांच्या हातात एक कॅमेराही आहे. त्यांच्या या फोटोत त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही दिसतो आहे. या लहान मुलाचीही त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

यावेळी हा लहानसा मुलगा अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहून तो क्युट स्माईल देतो आहे तर अमिताभ बच्चन हेही त्याच्याकडे पाहून हसत आहेत. त्यामुळे त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्हाला कदाचित असं वाटतं असेल की हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या कुठल्यातरी फिल्मच्या सेटवरचा असेल तर तसं नाहीये तर हा फोटो अभिषेक बच्चनच्या लहानपणीचा आहे. परंतु हा फोटो त्यांनी आताच का शेअर केला आहे? तुम्ही म्हणाल की त्यात काय कारण आहे? परंतु या फोटोसाठी त्यांनी एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. 

हेही वाचा : शाहीर साबळे यांच्यासोबत फोटोत दिसणारी गोंडस मुलगी कोण माहितीये?

अभिषेक बच्चनची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचा 'घुमर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिषेकच्या अभिनयाचीही यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली होती. गेल्या तीन वर्षांपासून अभिषेक हा ओटीटी प्लॅमफॉर्मवरून सक्रिय आहे. त्याचे अनेक चित्रपट आणि वेबसिरिज लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. 'लुडो', 'ब्रिथ', 'द बिग बुल' अशा चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणारा हा छोटासा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो अभिषेक बच्चन आहे. यावेळी अभिषेक बच्चनसाठी त्यांनी एक खास कॅप्शन लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या शेअर केलेल्या त्यांच्या या फोटोत त्यांनी लिहिलंय की, ''अभिषेक तु कॅमेऱ्याच्या पुर्वी सुरूवात केलीस (कॅमेऱ्यासमोर येण्यापुर्वी अभिनयाला सुरूवात केलीस) तेव्हा तुझं हे काम असंच सुरू ठेव. माझे आशीर्वाद तुझ्याच पाठीशी आहेत.'' त्यांच्या या पोस्टखाली नाना तऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. अभिषेक बच्चनंही यावेळी या पोस्टखाली कमेंट केली आहे. त्याचसोबतच श्वेता बच्चननंही या पोस्टखाली, 'टू क्यूट' अशी कमेंट केली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.