VIDEO : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग परफॉर्मन्सच्या डान्स रिहर्सलची प्रॅक्टिस करताना दिसले, मुकेश आणि नीता अंबानी

Mukesh Ambani and Neeta Ambani Dance in Pre-Wedding Function : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या परफॉर्मन्सनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  

दिक्षा पाटील | Updated: Mar 1, 2024, 03:57 PM IST
VIDEO : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग परफॉर्मन्सच्या डान्स रिहर्सलची प्रॅक्टिस करताना दिसले, मुकेश आणि नीता अंबानी title=
(Photo Credit : Social Media)

Mukesh Ambani and Neeta Ambani Dance in Pre-Wedding Function : सध्या संपूर्ण भारतात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगची. या दोघांच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम हा  जामनगरला सुरु आहे. त्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गजांनी आधीच तिथे हजेरी लावली आहे. त्यात अनेक क्रिकेटर्सची देखील नावं आहेत. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

खरंतर, दरवेळी काही खाास परफॉर्मन्स असेल तर अंबानी कुटंब हे परफॉर्म करताना दिसले. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला शेअर करत असं कॅप्शन दिलं की नीता मॅम आणि मुकेश सर यांचा रोमॅन्टिक डान्स. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की मुकेश अंबानी आणि नीता अंबानी एका जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांनी या दरम्यान, ते एकमेकांमध्ये कसे दंग झाले आहेत ते पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे त्याविषयी कोणतीही बातमी समोर आलेली नाही. हा व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्याशिवाय आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका,ईशा आणि तिचा पती आनंद पीरामल हे देखील या वेळी दिसले. 
 
सगळ्यांनी मिळून राधिका - अनंतसाठी 'वाह वाह राम जी' या गाण्यावर डान्स केला आहे. त्याआधी त्यांनी ईशा अंबानीच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नीता अंबानी यांनी भगवान श्री कृष्णच्या 'अधरम मधुरम वदनम मधुरम 'गाण्यावर सोलो डान्स केला होता.त्याशिवाय आकाश अंबानीच्या सारखपुड्यात देखील त्यांनी डान्स केला होता. 

हेही वाचा : अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानानं घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं मानधन!

दरम्यान, या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट परफॉर्म करणार आहेत. त्याशिवाय हॉलिवूडची लोकप्रिय गायिका रिहानाचा देखील या कार्यक्रमात तीन दिवस परफॉर्मन्स आहे. तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हा कार्यक्रम तीन दिवसांचा असणार असून आज सुरु झाला आहे तर 3 मार्च पर्यंत राहिल.