सलमानच्या कुटुंबासाठी आणखी एक धक्का, वेगळी झाल्यानंतर आता खान आडनाव ही सोडलं

खान कुटुंबातून अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय

Updated: May 20, 2022, 07:53 PM IST
सलमानच्या कुटुंबासाठी आणखी एक धक्का, वेगळी झाल्यानंतर आता खान आडनाव ही सोडलं title=

मुंबई : सोहेल खान आणि सीमा खान यांच्या घटस्फोटाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. ब-याच काळानंतर ती वेळही आली जेव्हा १३ मे रोजी दोघेही घटस्फोटाचा अर्ज घेऊन कोर्टात पोहोचले. रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा खूप दिवसांपासून एकत्र राहत नव्हते. त्यामुळे आता त्यांनी अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता सीमा खाननेही इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलले आहे.

सीमाच्या इन्स्टा प्रोफाइलमध्ये बदल

सोहेल आणि सीमा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान एक नवीन अपडेट समोर आले आहे. सीमाने तिचे इन्स्टा प्रोफाइल बदलून तिचे नाव सीमा किरण सचदेह ठेवले आहे. याआधी तिने सीमा खान या नावाने प्रोफाईल बनवले होते. घटस्फोटाची याचिका न्यायालयात पोहोचल्यानंतर सीमाने इंस्टाग्रामवर खान कुटुंबाचे आडनाव काढून टाकले आणि सांगितले की, आता दोघांमधील नाते वाचवण्यास वाव नाही.

नाव बदलण्यासोबतच सीमाने एक इंस्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की शेवटी सर्व काही संपून जाईल. कसे हे जाणून घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवावा. सीमा किरण सचदेहची इन्स्टा स्टोरी सांगत आहे की ही पोस्ट कुठेतरी तिच्या आणि सोहेलच्या नात्याशी संबंधित आहे. बाकी सत्य फक्त तीच सांगू शकते.

सीमा किरण सचदेह ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहेत. सीमा आणि सोहेलने 1998 मध्ये लग्न केले आणि त्यांचा नवा संसार थाटला. लग्नानंतर दोघांना दोन मुलं झाली. सीमाचे कुटुंबीय तिच्या आणि सोहेलच्या नात्याच्या विरोधात होते, असे सांगितले जाते. त्यामुळे दोघांना पळून जाऊन लग्न करावे लागले. वर्षांनंतरही त्यांच्या अचानक ब्रेकअपचे कारण कोणालाच समजू शकलेले नाही.