एक्स गर्लफ्रेंडच्या नात्यावर अनूप जलोटांची प्रतिक्रिया

जसलीन मथारूचा स्वयंवरात सहभाग 

Updated: Feb 24, 2020, 10:28 AM IST
एक्स गर्लफ्रेंडच्या नात्यावर अनूप जलोटांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : भजन सम्राट अनूप जलोटा (Anup Jalota) आणि जसलीन मथारू (Jasleen Matharu) यांनी लव कपल म्हणून 'बिग बॉस 12' (Bigg Boss 12)मध्ये अतिशय लोकप्रिय होते. आता हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण जसलीन मथारू अनूप जलोटांची साथ सोडून पारस छाबडासोबत स्वयंवर रचण्यास पोहोचली आहे. या स्वयंवरावर पहिल्यांदा अनूप जलोटा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत, अनूप जलोटा यांनी जसलीनच्या या स्वयंवरावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न विचारण्यात आला की,'जसलीनच्या पार्टनरमध्ये काय चांगले गुण असणं गरजेचं असेल, असा प्रश्न विचारण्यात आला.' त्यावर अनूप जलोटांना क्षणाचाही विलंब न करता,'ती व्यक्ती माझ्यासारखी असली पाहिजे. मी अतिशय नम्र आहे. तसेच आपल्या कामावर कायमच फोकस करतो.'

VIDEO: पारस से शादी करने पहुंचीं जसलीन मथारू संग अनूप जलोटा को लेकर हुआ 'गंदा' मजाक

रिपोर्टनुसार, अनूप जलोटांनी जसलीन आणि पारस यांच्या स्वयंवराला उपस्थित राहण्यावर म्हटलं की,'जसलीन मथारू या कार्यक्रमात खरं लग्न करणार आहे? याबाबत मला काहीच माहित नाही. मात्र तिने असं करायला नका.' तसेच काही दिवसांपूर्वीच जसलीनचा अनूप जलोटांना फोन आला होता. तेव्हा तिने 'मुझसे शागी करोगे' या कार्यक्रमात सहभागी होणार का? असं विचारलं होतं. हा कार्यक्रम तीन महिने चालणार असल्याची माहिती देखील तिने दिली होती.  

'वो मेरी स्टुडेंट' हा आगामी सिनेमा येणार असून याचं शुटिंग थांबवण्यात आलं आहे. तेव्हा अनूप जलोटांनी तिला विचारलं की, 'हा शो तिच्यासाठी इतका महत्वाचा आहे का?' त्यावर जसलीनची प्रतिक्रिया होती की,'हा शो माझ्यासाठी महत्वाचा आहे. ही मला खूप चांगली संधी आहे.'