अनुपम खेर - अनुष्का शर्मा यांच्यात 'विराट' चर्चा

अनुपम खेर यांची सोशल मीडिया पोस्ट

Updated: Jun 16, 2019, 06:15 PM IST
अनुपम खेर - अनुष्का शर्मा यांच्यात 'विराट' चर्चा  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पती विराट कोहलीला चिअर्स करण्यासाठी लंडन, मॅनचेस्टरमध्ये दाखल झाली आहे. यावेळी बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची अनुष्काशी भेट झाली. या भेटीदरम्यान अनुपम खेर यांनी अनुष्का आणि त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक विषयांसह, त्यांच्या आवडत्या विराट कोहलीबद्दलही चर्चा केल्याचं अनुपम यांनी म्हटलं आहे.

अनुपम खेर आणि अनुष्का शर्मा यांनी आतापर्यंत 'बदमाश कंपनी' आणि 'जब तक है जान' या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुपम यांनी फोटो शेअर करत 'माझी आवडती अभिनेत्री अनुष्का शर्माची लंडनमध्ये भेट झाली. आम्ही एकत्र खूप काम केलेलं नाही. परंतु मी नेहमीच तिच्या कामाची आणि तिच्या कूल अॅटिट्यूटची प्रशंसा केली असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे.

'आम्ही चित्रपट, अयशस्वीपणाची ताकद, आर्मी लाइफ आणि आमचा आवडता विराट कोहलीबाबत चर्चा केली' असल्याचं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०१७ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांनी इटलीत अत्यंत खासगीमध्ये लग्न केलं. 

विश्वचषकातील बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. विश्वचषक २०१९ मध्ये भारताने साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.