'घुमर' गाण्यातून रसिकांंच्या भेटीला आली राणी नागमती

संजय लीला भंसाळींचा आगामी चित्रपट 'पद्मावती' चित्रीकरणाच्या पवेळेपासूनच वादात अडकली आहे.

Updated: Oct 30, 2017, 11:46 AM IST
'घुमर' गाण्यातून रसिकांंच्या भेटीला आली राणी नागमती title=

मुंबई : संजय लीला भंसाळींचा आगामी चित्रपट 'पद्मावती' चित्रीकरणाच्या पवेळेपासूनच वादात अडकली आहे.

'पद्मावती' चित्रपटामध्ये  दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. 

काही दिवसांपूर्वी 'पद्मावती' चित्रपटातील 'घुमर' गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.  या गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 'घुमर' गाण्यामध्ये दीपिकाने राजस्थानी पारंपारिक नृत्य केलं आहे. त्यामधील तिचा राजेशाही अंदाज लक्ष्यवेधी ठरला आहे. पण यामध्ये अजून एक स्त्री प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. 

 

 
 दीपिका सोबतच राजेशाही अंदाजामध्ये अभिनेत्री अनुप्रिया गोएंका दिसणार आहे. अनुप्रियाने 'पद्मावती'मध्ये राणी नागमतीची भूमिका साकारली आहे. राणी नागमती ही महाराजा रवल रतन सिंग यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 
 
 अनुप्रिया ही व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. २०१३ साली तेलगू चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. त्यानंतर पाठशाला, बॉबी जासूस, ढिशुम अशा चित्रपटांमध्ये झळकली आहे.
 
 'घुमर' गाण्याला आजपर्यंत २५ मिलियन हून अधिकवेळेस पाहिले आहे. संजय लीला भंसाळीचा हा सिनेमा 1 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.