Video : 'तू लग्न कधी करणार?' कॅमेरासमोरच लेकानं मलायकाला विचारला प्रश्न आणि मग....

Arhaan Khan- Malaika Arora : अरहान खाननं त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या या नव्या शोचा प्रोमो शेअर केला आहे. त्यात त्यानं थेट कॅमेऱ्यासमोर मलायकाला दुसऱ्यांना लग्न कधी करणार याविषयी सांगितलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Apr 17, 2024, 12:50 PM IST
Video : 'तू लग्न कधी करणार?' कॅमेरासमोरच लेकानं मलायकाला विचारला प्रश्न आणि मग.... title=
(Photo Credit : Social Media)

Arhaan Khan- Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'डंब बिरयानी' या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक प्रोमो आला होता त्यात अरबाज खान आणि सोहेल खानसोबत अरहान आणि त्याचे मित्र गप्पा मारताना दिसले. त्यांच्यात जो संवाद झाला त्याची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती. आता अरहानचा त्याची आई मलायकासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात अरहान आणि मलायका बोल्ड विषयावर चर्चा करताना दिसणार आहेत. ते दोघं सेक्स, व्हर्जिनीटी आणि लग्न या विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. 

अरहाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पॉडकास्टमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो आहे. यात मलायका अरोरा तिच्या मुलाला म्हणजेच अरहानला त्यानं व्हर्जिनिटी कधी लूज केली म्हणजेच पहिल्यांदा सेक्स कधी केलं याविषयी विचारताना दिसते. मलायकानं विचारलेला हा प्रश्न ऐकताच अरहान काही वेळ शांत झाला थोडक्यात तो निशब्द झाला. पुढे ते दोघं सोशल मीडियाविषयी बोलताना दिसतात. तर अरहाननं मलायकाला विचारलं की लोकप्रियतेसाठी ती सोशल मीडियाची मदत घेते? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायका अरोरा या प्रश्नावर उत्तर देत हे चूकिचं आहे असं म्हणतं. त्यानंतर अरहाननं मलायकाला असा प्रश्न विचारला ज्याची प्रेक्षक गेल्या बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत आहेत. अरहान मलायकाला विचारतो की तू लगन कधी करणार आहेस? त्यावर आता मलायकाचं उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्याच कारण म्हणजे गेल्या एपिसोडमध्ये जेव्हा अरहाननं अरबाज आणि सोहेलशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. 

हेही वाचा : आमिर खान डीप फेक व्हिडीओचा शिकार, 'या' बड्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल

दरम्यान, अरबाज आणि मलायका हे 1998 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 19 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तर 2016 मध्येच विभक्त झालेल्या या जोडप्याचा 2017 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट झाला. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका ही अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर ते दोघं लग्न कधी करणार याविषयी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडल्याचे पाहायला मिळते. तर दुसरीकडे अरबाजनं मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लग्न केलं.