'9 महिन्यात लोकांना मुलं होतात, तर माझी...'; अर्जुन कपूरच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Arjun Kapoor : अर्जुन कपूरच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सगळ्यांनी त्याचं लक्ष वेधलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2024, 12:54 PM IST
'9 महिन्यात लोकांना मुलं होतात, तर माझी...'; अर्जुन कपूरच्या 'त्या' व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष title=
(Photo Credit : Social Media)

Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा त्याच्या अभिनयासोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अर्जुन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अर्जुन कपूरनं शेअर केलेल्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर हा प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात 4 वर्षानंतरच्या ट्रान्सफॉर्मेशनविषयी बोलताना अर्जुन कपूरनं केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अर्जुन कपूरनं 'सिंघम अगेन' या चित्रपटाचं शूट संपल्यानंतरच्या ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. 'सिंघम अगेन' चं शूट संपवल्यानंतर अर्जुनला त्याचा लूक बदलायचा होता. त्याचा व्हिडीओ अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन कपूर हा हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमकडे गेल्याचे दिसत आहे. हेअर कट केल्यानंतर अर्जुन कपूरचा डॅपर लूक त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्यासोबत अर्जुन कपूरनं त्याची दाढी देखील ट्रिम केली आहे. त्याच्या या लूकला नेटकऱ्यांनी सुपर स्टायलिश असं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अर्जुन कपूर हा मजेदार कॉमेंट्री करताना दिसतोय. त्यावेळी अर्जुन म्हणाला की "कुत्ते चित्रपटाच्या वेळी थोडे केस कापले होते. आता 4 वर्षांनंतर प्रॉपर कापले जातील. तर ही दाढी 9 महिन्यांनंतर कापली जाणार. 9 महिन्यात लोकांना मुलं होतात, माझी दाढी कापली जाईल आज." त्यानंतर अर्जुन आलिमला बोलताना दिसतोय की 'भाऊ, मला सेक्सी बनव.' 

अर्जुन कपूरनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की 'हाय सीरी, चल हेअरकट करुया.' एक नेटकरी अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहून म्हणाला, 'अर्जुन कपूर तुझे विनोद हे अप्रतिम असतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अर्जुन तू हॅन्डसम दिसतोयस.' अशाच अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : 'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा

अर्जुन कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय त्याच्याकडे 'मेरी पत्नी' या चित्रपटात दिसणार आहे.