जगभरातील बॉडी बिल्डर्सचा आदर्श अरनॉल्डनं Gym सोडलं, म्हणाला ‘माझ्या हृदयात…’

Arnold Schwarzenegger health update : बॉडी बिल्डर्सचा आदर्श म्हणून जगभरात फेमस असलेल्या अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी अखेर जीमला आराम दिला आहे. नेमकं कारण काय? पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Mar 25, 2024, 08:10 PM IST
जगभरातील बॉडी बिल्डर्सचा आदर्श अरनॉल्डनं Gym सोडलं, म्हणाला ‘माझ्या हृदयात…’ title=
Arnold Schwarzenegger health update

Arnold Schwarzenegger left the gym : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि बॉडी बिल्डर अरनॉल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) यांची सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. हृदयाचे ठोके अनियमित असल्याने त्यांना पेसमकरची मदत (secret heart surgery) घ्यावी लागली. हॉलिवूड स्टार अरनॉल्ड यांनी यावर खुलासा केला. टर्मिनेटर पात्राप्रमाणेच मी आता मशीन पार्ट आहे. याचा अर्थ आता मला जिममधून ब्रेक घ्यावा लागेल, असा अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी (Arnold Schwarzenegger health update) म्हटलं आहे. पण हा धक्का असूनही अरनॉल्डनं चाहत्यांना वचन दिलंय की तो लवकरच त्याच्या टीव्ही शोच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगसाठी परत येईल.

अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्यावर क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. अनियमित हृदयाचा ठोका आढळून आल्यानंतर त्याला पेसमेकर लावण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मशीन बनण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली. डॉ. स्टार्नेस यांनी अरनॉल्ड यांच्यावर शस्त्रक्रिया केली. अनेक सिनेमांमध्ये सीआयए एजंटची भूमिका साकारणाऱ्या अरनॉल्ड यांची बरीच फॅन फॉलोविंग आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता देखील व्यक्त केलीये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arnold Schwarzenegger (@schwarzenegger)

अरनॉल्ड श्वार्झनेगर आहेत तरी कोण?

अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म 30 जुलै 1947 रोजी ऑस्ट्रियामध्ये झाला. वडील गुस्ताव हे पोलीस अधिकारी होते. अरनॉल्डचे पालक खूप कडक होते, असं त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. अरनॉल्ड किंवा त्यांच्या मोठ्या भावाने काही चूक केली तर दोघांनाही लाठीने मारहाण करत असत. वडिलांचं अरनॉल्डपेक्षा मोठा मुलगा मेनहार्डवर जास्त प्रेम होतं. मी त्यांचा खरा मुलगा नाही, असा मला संशय होता, असंही त्यांनी सांगितलं होतं. वडिलांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे अरनॉल्डने छोटीशी चूक केली तरी त्यांना मार बसायचा. वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी लहानपणापासूनच खेळात भाग घेण्यास सुरुवात केली. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली होती.

वडिलांची इच्छा होती की अरनॉल्डने त्याच्यासारखा पोलीस अधिकारी व्हावा. आपल्या मुलाची खेळ आणि बॉडी बिल्डिंगची आवड पाहून पालकांना काळजी वाटू लागली. मात्र वडिलांनी मला कधी रोखलं नाही, असंही अरनॉल्ड सांगतात. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी बॉडी बिल्डिंगमध्ये मिस्टर युनिव्हर्सचा किताब पटकावणारा अर्नोल्ड हा सर्वात तरुण व्यक्ती ठरला होता. वयाच्या 18 व्या वर्षी देशाची सेवा करण्यासाठी ऑस्ट्रियन सैन्यात दाखल झाले होते. त्यावेळी लष्कराचे काम नीट न केल्यामुळे त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 23 व्या वर्षी बॉडी बिल्डिंगमध्ये मिस्टर ऑलिंपिया खिताब देखील जिंकला होता.