कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांकडूनच Sapna Choudhary विरोधात तक्रार दाखल

सपना चौधरी अडचणीत आली आहे. 

Updated: Nov 20, 2021, 06:34 PM IST
कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांकडूनच Sapna Choudhary विरोधात तक्रार दाखल title=

मुंबई : सपना चौधरी अडचणीत आली आहे. प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे तिला अटक होऊ शकते. लखनौच्या एका न्यायालयाने प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीवर कार्यक्रम रद्द केल्याबद्दल आणि तिकीटधारकांना पैसे परत न केल्याबद्दल अटक वॉरंट जारी केले आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी सपना चौधरीविरुद्ध वॉरंट जारी करताना पोलिसांना 22 नोव्हेंबरपर्यंत या खटल्याच्या सुनावणीची पुढील तारीख आहे, असे बजावले.

सपना चौधरीविरुद्ध 14 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. 13 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या स्मृती उपवन येथील डान्स शो रद्द करण्यात आल्यापासून सपनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Sapna Choudhary: मशहूर डांसर सपना चौधरी हो सकती हैं गिरफ्तार, कोर्ट ने जारी किया वारंट, जानें मामला

या एफआयआरमध्ये डान्सरशिवाय कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इबाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांचीही नावे आहेत.

Court Issues Arrest Warrant Against Sapna Choudhary | सपना चौधरी के खिलाफ  कोर्ट ने जारी किया वारंट

या कार्यक्रमाची तिकिटे 300 रुपयांना ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक आले होते, मात्र चौधरी रात्री दहापर्यंत न पोहोचल्याने जमावाने घटनास्थळी एकच गोंधळ घातला. जनतेचे पैसेही त्यांना परत मिळाले नाहीत.