'माझ्या छातीवर…'सतत रडण्याचे सीन करुन अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता 'हा' आजार

. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपुर्वी या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला होता. 

Updated: Apr 19, 2024, 06:32 PM IST
'माझ्या छातीवर…'सतत रडण्याचे सीन करुन अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता  'हा' आजार title=

मुंबई : आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच या मालिकेत काहीतरी वेगळे ट्विस्ट पहायला मिळतात. ही मालिका फार कमी वेळात लोकप्रिय ठरली. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपुर्वी या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला होता. आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीची झालेली अवस्था तिच्या खऱ्या आयुष्यातही याचा पडसाद पडत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने याविषयी खुलासा केला आहे. या सेगमेंटचं शूटींग करताना अरुंधतीला सतत रडून खऱ्या आयुष्यात एक आजारा झाला होता. याबाबत स्वतः अरुंधती एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

मधुराणीने केला मोठा खुलासा
नुकतीच मधुराणी प्रभुलकरने 'मिरची मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्री अनेक विषायांवर निर्भीडपणे बोलली.  सतत एका भूमिकेत राहून होणाऱ्या त्रासाविषयी विचारण्यात आलं. यावर बोलताना मधुराणी म्हणाली, ''खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकेतवर होतो. मला हातच राखून काम करता येतं नाही  मी त्या भूमिकेत खूप  घुसते. ते चांगलंय का वाईट? हे मला माहित नाही. पण मला कधी-कधी असं वाटतं की, आपल्याकडे ती ऑन-ऑफ करण्याची कौशल्य  का नाहीयेत? पण तिच माझी खरी खासियत आहे. मी अशी आहे आणि असंच मला करता येतं.''

''आता जो आशुतोष गेल्यानंतरचा ट्रॅक होता. तर मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते. म्हणजे कन्टिन्यू रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाइलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होत होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं. आता मी पुन्हा बरी आहे.''

'मी त्यादरम्यान घरी गेले होते. एक-दोन दिवस मला सुट्टी होती. माझ्या बहिणीकडे गेले होते. तिथे आई होती. माझ्या बहिणीला बरं नव्हतं म्हणून मी तिला मदत करायला गेले होते आणि मीच जाऊन झोपले. त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मग माझ्या एका मित्राने सांगितलं की, काही प्रमाणत तूही त्या ट्रॉमातून गेली आहेस. भावनिक दृष्ट्या तू तुझ्या  त्या प्रवासातूनही गेली आहेस. त्यामुळे तू तुझ्या आईला समजवून सांग की, मला झोप गरजेची होती. मालिकेचं काम करताना तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. सतत कन्टिट्यू त्या चक्रात असता. त्यामुळे मला असं वाटतं, सर्व कलाकारांनी कधींना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या चार वर्षांच्या अनुभवातून शिकले,'' असं मधुराणीने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.