''ऊस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे. पण आम्हा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शत्रू''

तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय, एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरुण नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरंतर

Updated: Dec 16, 2020, 10:13 PM IST
''ऊस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे. पण आम्हा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शत्रू'' title=

(हे पत्र अरविंद जगताप यांनी लिहिला आहे, चला हवा येऊ द्या, या मी मराठीवरील मालिकेत ऊसतोड कामगारांचं पत्र) -  तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय, एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरुण नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरंतर तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. इथून पुढेही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. पण आज मला माझ्या स्वप्नाविषयी बोलायचंय. माझ्यासारख्या दहा बारा लाख ऊसतोड कामगारांविषयी बोलायचंय. तुम्हा तिघांशी बोलायलाच पाहिजे कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्यांशी संबंधित. ज्या बीड आणि नगर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त उसतोड कामगार राहतात त्याचे तुम्ही प्रतिनिधी.

तुमचं जसं जन्मापासून उसाशी नातं आहे तसंच माझंही. गरोदर असताना आई ऊसतोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. ते उसाचं पाचट आहे का आयुष्याला मारलेलं पाचर आहे हे मला अजून ठरवता आलेलं नाही. 

ऊस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे. पण आम्हा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शत्रू. या ऊसामुळे ऐन दिवाळीत आमचं गाव ओसाड पडलेलं असतं. तुम्हाला माहितीय पण खूप लोकांना विश्वास बसणार नाही दोनशे घरांचं आमचं गाव दिवाळीत सूतक पडल्यासारखं शांत असतं. हा संपूर्ण पत्र वाचा  www.arvindjagtap.com वर