Year Ender 2019 : यंदाच वर्ष आयुष्मान खुरानासाठी खास

आयुष्मानच्या सिनेमांचीच चर्चा 

Updated: Dec 13, 2019, 08:40 AM IST
Year Ender 2019  : यंदाच वर्ष आयुष्मान खुरानासाठी खास  title=

मुंबई : 2019 मध्ये बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये आयुष्मान खुरानाने तब्बल 500 करोड रुपयांची कमाई केली आहे. आयुष्मान खुराच्या तीन सिनेमांनी 500 करोड रुपयांची कमाई केली असून यात आर्टिकल 15, ड्रीम गर्ल आणि बाला सारख्या सिनेमांचा समावेश आहे. आयुष्मानच्या सिनेमांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली तर समीक्षकांकडून कौतुक. 

मी त्या सिनेमांचा विचार करतो, जे सिनेमे प्रेक्षकांना आवडतील, त्यांच मनोरंजन करतील, असं आयुष्मान सांगतो. अभिनेता म्हणून यंदाच वर्ष खास आहे. या वर्षात मी अनेक गोष्टी शिकलो. पुढे मला याची खूप मदत होईल, अशी भावना आयुष्मानने व्यक्त केली आहे. (नवा लूक पाहून आयुष्मानची आई असं काही म्हणाली की....) 

 

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Bala ki tasveer aapne banaayi. #Bala ki taqdeer aapne banaayi. #gratitude

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

त्याच्या या वर्षाबद्दल आयुष्मान बोलतो,'हे वर्ष माझं डोळे उघडणारं वर्ष ठरलं. हे वर्ष खास असून माझा आत्मविश्वास वाढवणारं वर्ष ठरलं आहे. मला फक्त असेच कंटेट हवं जे अगदी फ्रेश, अद्वितीय आणि प्रयोगशील असेल. कारण लोकांना माझ्याकडून याच अपेक्षा आहेत. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांच कौतुक माझ्यासाठी महत्वाचं आहे.' 

आयुष्मान सध्या 'शुभमंगल ज्यादा सावधान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'शुभमंगल सावधान' सिनेमाचा सिक्वल आहे. नुकतंच या सिनेमाचं पहिल्या शेड्युलचं शुटिंग बनारसमध्ये संपल आहे. या सिनेमासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो सिताबो'मध्ये काम करत आहे. 

नुकताच आयुष्मानने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये लाइट ब्रोंज शेडची टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली आहे. यासोबतच गोल्डन प्रिंट जॅकेट देखील घातलं आहे. या फोटोत त्याचा स्टायलिश लूक पाहायला मिळतं.