या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आयुष्मान खुरानाचा लिपलॉक सीन व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या करिअरचा ग्राफ्ट रॉकेटसारखा वर गेला आहे.

Updated: Nov 2, 2021, 09:30 PM IST
या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आयुष्मान खुरानाचा लिपलॉक सीन व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या करिअरचा ग्राफ्ट रॉकेटसारखा वर गेला आहे. त्याचे जवळ-जवळ सगळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. अभिनेता सिनेमाच्या निवडीबाबत खूप सिरीअस असतो. आगामी काळात त्याचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. याच दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वाणी कपूरसोबत लिपलॉक फोटो वायरल
या फोटोमध्ये आयुष्मान खुराना बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरला किस करताना दिसत आहे. या दोघांचा हा फोटो खरं तर 'चंडीगड करे आशिकी' चित्रपटाचा फर्स्ट लूक आहे. निर्मात्यांव्यतिरिक्त, आयुष्मान खुरानाने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 थोडं वेगळं आहे हे प्रेम 
चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत आयुष्मान खुरानाने लिहिलं, 'ही आशिकी काहीतरी वेगळी आहे. चंदीगड करे आशिकीचा ट्रेलर ८ नोव्हेंबरला रिलीज होणार! 10 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रेमात पडण्यासाठी सज्ज व्हा.' आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट खूपच वेगळा असणार आहे. याचा अंदाज या कॅप्शनवरून लावला जाऊ शकतो.