पद्मावतलाही मागे टाकत बागी 2 ने केली जबरदस्त ओपनिंग...

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 2 या सिनेमाच्या प्रतिक्षेत टायगर-दिशाने फॅन्स होते. 

Updated: Mar 31, 2018, 10:44 AM IST
पद्मावतलाही मागे टाकत बागी 2 ने केली जबरदस्त ओपनिंग... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 2 या सिनेमाच्या प्रतिक्षेत टायगर-दिशाने फॅन्स होते. आणि सिनेमा प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर चागंलीच धमाल केली. 2018 ची आतापर्यंतचा ग्रॅंड ओपनिंग असलेला सिनेमा म्हणजे पद्मावत. पण बागी 2 ने पद्मावतलाही मागे टाकले आहे. बागी 2 ची पहिल्या दिवसाची कमाई पाहता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल, अशी आशा वर्तवली जात आहे. ट्रेंड अनालिस्ट रमेश बालाने बागी 2 ची पहिल्या दिवसाची कमाई ट्वीट करुन जाहीर केली.

किती केली कमाई?

आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ट्वीट करताना रमेश बाला यांनी लिहिले की, टायगर श्रॉफच्या बागी 2 ला भारतात पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळाली. पद्मावतने 19 कोटींची कमाई केली  होती तर बागी 2 ने 20 कोटींची कमाई केली आहे. अजूनही विकेंड बाकी आहे. त्यामुळे वीकेंडला सिनेमा चांगले प्रदर्शन करेल, अशी आशा आहे. पहा ट्वीट...