'आश्रम' फेम बबिताने सीरिजमध्ये तर बोल्ड सीन दिलेचं, पण समुद्र किनारी मात्र....

. त्रिधा चौधरी बॉबी देओलसोबत पुन्हा एकदा शोमध्ये धमाल करणार आहे. 

Updated: May 12, 2022, 03:30 PM IST
'आश्रम' फेम बबिताने सीरिजमध्ये तर बोल्ड सीन दिलेचं, पण समुद्र किनारी मात्र.... title=

मुंबई : प्रकाश झा यांच्या आश्रम या सुपरहिट वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाचा मोशन व्हिडिओ आज रिलीज झालं आहे. त्रिधा चौधरी बॉबी देओलसोबत पुन्हा एकदा शोमध्ये धमाल करणार आहे. रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. फक्त आश्रम 3 चा लोगो आणि धगधगती आग दिसत आहे. यावरून या वेळी काही नवीन घडणार आहे. याचा अंदाज बांधता येत नाही. पण आग बघून काहीही झालं तरी आग लावणारीच असेल. असा अंदाज बांधता येतो.

त्रिधा चौधरीचा बोल्ड फोटो
त्रिधा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. मस्टर्ड कलरच्या मोनोकिनीत एक सुंदर बंगाली बाला समुद्रकिनारी बसली आहे. तिने नाजूक नेकलेस घातला आहे आणि मॅचिंग लिपस्टिक लावली आहे. या फोटोंनी त्रिधा आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावत आहे.

त्रिधाच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका युजर्सने फायर इमोजी शेअर केले आहेत. तर तिथे एकाने कमेंट करत लिहिलं आहे की, प्रत्येक ड्रेस तुम्हाला सूट करतो. मग ते वेस्टर्न असो वा पारंपारिक

त्रिधाचा हा हॉट अवतार लोकांना खूप आवडला आहे. काही वेळापूर्वीच हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर चाहत्यांनी या फोटोवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.  आश्रमानंतर त्रिधा चौधरीच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो.

त्रिधा बऱ्याच काळापासून अभिनयाच्या जगात सक्रिय आहे. त्रिधा आगामी काळात रणबीर कपूर स्टारर शमशेरा या चित्रपटातही दिसणार आहे. त्‍याने विक्रम भट्टच्‍या वेब सिरीज स्‍पॉटलाइटमध्‍येही काम केलं आहे.