'बालक-पालक' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

लॉकडाऊनमध्ये आणखी एक कलाकार लग्नबंधनात 

Updated: Dec 24, 2020, 10:20 AM IST
'बालक-पालक' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात पसरला आहे. असं असलं तरी लॉकडाऊनमध्ये विवाह सोहळे काही थांबले नाहीत. अनेकांनी या लॉकडाऊनमध्येही आपलं मंगल कार्य हुरकून घेतलं. अशाच एका अभिनेत्रीने लॉकडाऊनमध्ये आपलं 'कर्तव्य' सोहळा पार पाडला आहे. 

'बालक-पालक' मधील डॉली तुम्हाला आठवतेय का? हो अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्नबंधनात अडकली आहे. शाश्वतीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. शाश्वतीने फोटोग्राफर राजेंद्र करमरकरशी लग्न केलं आहे. हा लग्नसोहळा सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली असल्याचं दिसून आलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Das (@ganeshdasphotography_)

शाश्वतीने काही दिवसांपूर्वी राजेशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली. आता शाश्वतीने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. शाश्वती आणि राजेशच्या लग्नाचे फोटो गणेश दास या फोटोग्राफरने काढले आहेत. 

शाश्वतीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'चाहूल', 'पक्के शेजारी', 'सिंधू' या मालिकेत काम केलं आहे. तसेच रवी जाधव दिग्दर्शित 'बालक पालक' सिनेमातही शाश्वतीने 'डॉली' हे पात्र साकारलं आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुकही झालं. 

गायिका नेहा कक्कर, अभिनेता आदित्य नारायण, अभिनेता शाहीन शेख, कोरिओग्राफर पुनीत पाठक, अभिनेत्री गौहर खान, सई लोकूर हे कलाकारही विवाहबंधनात अडकले.