बहुचर्चित 'बारायण' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बारावीचं वर्ष हे घरातील सर्वांसाठी तसेच मित्र आणि परिचितांसाठी कसा चर्चेचा विषय असतो. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 24, 2017, 04:32 PM IST
बहुचर्चित 'बारायण'  सिनेमाचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : बहुचर्चित 'बारायण' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बारावीच्या मुलांची पालकांच्या अपेक्षांमुळे काय काय तारांबळ उडते ते या सिनेमात, मजेशीर मांडलंय. 

बारावीचं वर्ष हे घरातील सर्वांसाठी तसेच मित्र आणि परिचितांसाठी कसा चर्चेचा विषय असतो. 

हे बारायणच्या ट्रेलरवरून दिसून येत आहे. एकंदरीत सिनेमाचा प्रोमो पाहिला तर सिनेमातील संवाद अधिक स्पष्ट आणि साधे सोपे आहेत, त्यामुळे कोण काय बोललं असं विचारण्याचा प्रश्न येत नाही. कॅमेरा अँगल्स देखील अधिक जवळ जाणारे आणि स्पष्ट आहेत.