नक्षलवादी ते 'डिस्को डान्सर'... अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा प्रवास

....

Updated: Jun 16, 2018, 12:34 PM IST
नक्षलवादी ते 'डिस्को डान्सर'... अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा प्रवास title=

मुंबई: सेलिब्रेटींचे पूर्वायुष्य हे अनेकांच्या कुतूहलाचा विषय. त्यातही हे सेलिब्रेटी जर नामांकीत अभिनेते असतील तर काहीसे अधिकच. विशेष असे की, बहुतांश सेलिब्रेटींचे पूर्वायुष्य हे हटके असले तरी, रूढार्थाने ते सर्वसामान्यच असते. पण, काही अभिनेते असे असतात की, त्यांचे आयुष्य खरोखरच उलथापालथीने भरलेले असते. इतके की, ते आजही त्यांच्या पूर्वायुष्यात असते तर, कादाचित या जगातच ते नसते किंवा असले तरी, समाजापासून ते इतके दूर गेलेले दिसले असते की, ते केवळ कायदा आणि पोलिसांच्या निशाण्यावर असते. होय, आम्ही बोलत आहोत बॉलिवुडचा अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्याबातब. मिथूनदांचा आज (१६ जून) वाढदिवस. म्हणूनच मिथूनदांच्या अभिनयासह पूर्वायुष्यावर टाकलेला हा एक कटाक्ष.....

बॉलिवुडचा 'डिस्को डान्सर' ठरलेला अभिनेता मिथून चक्रवर्ती आज वयाची ६८ वर्षे पूर्ण करत आहेत. १६ जून १९५० मध्ये जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांनी सुमारे ३५०हून अधिक बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी बंगाली, उडिया आणि भोजपूरी चित्रपटांतूनही अनेक भूमिका साकारल्या आहेत. कामे केली आहेत.

एकेकाळचा नक्षलवादी आजचा सुप्रसिद्ध अभिनेता...

मिथून चक्रवर्ती हे आज एक यशस्वीच नव्हे तर, लोकप्रिय अभिनेते म्हणून आपल्याला दिसतात. पण, एक काळ होता मिथून चक्रवर्ती हे सुरूवातीच्या काळात नक्षलवादी होते. पण, एका दुर्घटनेत त्यांच्या बंधूंचा मृत्यू झाला आणि ते पुन्हा आपल्या कुटुंबात परतले. कुटुंबाची जबाबदारी आली आणि ते नक्षलवादापासून ते दूर झाले. दरम्यान, मिथून चक्रवर्तींना डान्सची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी स्टेज शो करण्यास सुरूवात केली. सोबतच त्यांना अभिनय करण्याचीही इच्छा होती. त्यामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी त्यांनी अभिनेत्री आणि कॅब्रे डान्सर हेलनचा असिस्टंट म्हणूनही काम पाहिले.

पहिल्याच चित्रपटाला पुरस्कार

'मृगया' या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाबद्धल मिथून चक्रवर्ती यांना सर्वश्रेष्ठ अभिनयाचा पुरस्कार मिळाला. आज मिथूनदा २४० कोटी रूपयांचे मालक असल्याचे बोलले जाते. ते मोनार्क ग्रूप ऑफ हॉटेल्सचे मालकही आहेत. तसेच, उटी मसिनागुडी आणि कर्नाकमधील म्हैसुर येथे त्यांची पंचतारांकीत हॉटेल्सही आहेत.

शेकडो चित्रपटात काम केलेले मिथूनदा आजही आपल्या क्षेत्रात कार्यकरत आहेत. तसेच, आजही ते चित्रपट, टीव्ही शो, अवार्ड फंक्शन आदींच्या माध्यमातून चाहते आणि प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.