सिक्रेट गेम्स- मिर्जापूरमधील प्रसिद्ध अभिनेत्याने उलघडलं रहस्य, म्हणाला भूमिका निवडताना...

'या' अभिनेत्याने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांची मने जिंकली आहेत

Updated: Jul 17, 2021, 05:35 PM IST
 सिक्रेट गेम्स- मिर्जापूरमधील प्रसिद्ध अभिनेत्याने उलघडलं रहस्य, म्हणाला भूमिका निवडताना... title=

मुंबई : 'मिर्जापूर'चा कालीन भैया असोत किंवा' सेक्रेड गेम्स'चा गुरुजी असोत किंवा मग 'स्त्री'मधील रुद्र भैया असोत, पंकज त्रिपाठीने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांची मने जिंकली आहेत. आता लवकरच तो  kriti senon स्टारर फिल्म 'मिमी'मध्ये दिसणार आहे. कोणताही चित्रपट किंवा सिरीज निवडताना तो काय काळजी घेतो हे आपल्याला माहिती आहे का? याचा खुलासा स्वतः अभिनेता पंकज त्रिपाठीने केला आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठीने चित्रपटाची निवड करताना त्याच्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल सांगितलं आहे. पंकज म्हणाला, ''मला आवडलेल्या कथा किंवा पात्र साकारायला आवडतं किंवा मग मला एखादा संदेश असणारा चित्रपटत करायला आवडतो. प्रोजेक्ट निवडण्यापूर्वी, लैंगिक संवेदनशीलता आहे की नाही आणि एक चित्रपट निर्माता चित्रपटाद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे का हे पण मी पाहतो. '

या गोष्टींची घेतो काळजी
पुढे तो म्हणाला, 'बॉक्स ऑफिस कलेक्शन एक बाय-प्रोडक्ट आहे.  मला फक्त चित्रपटाद्वारे संदेश द्यायचा आहे. प्रत्येक कथेतून संदेश देण्याचं माझं उद्दीष्ट असतं. यासाठी मी याची विशेष काळजी घेतो.

कशी आहे 'मिमी' स्टोरी
अभिनेता आगामी 'मिमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. बॉलिवूडमध्ये नशीब अजमावणाऱ्या आणि जोडप्यांसाठी सरोगेट बनू इच्छिणाऱ्या मुलीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पंकजने मिमीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

हे कलाकार चित्रपटात आहेत
या चित्रपटात सई ताम्हणकर, सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा मुख्य भूमिकेत असून 30 जुलैपासून जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.