भगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?

Oppenheimer : तुमच्या भेटीला येतेय एक अशी कथा, ज्यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं संपूर्ण जग बदललं असंच म्हणावं लागेल. अणुबॉम्बच्या जनक असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? पाहा...   

सायली पाटील | Updated: Jul 18, 2023, 11:17 AM IST
भगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण? title=
before watching moviw know more about Oppenheimer and his connection with Bhagavad Gita watch video

Oppenheimer Movie : काही चित्रपट हे स्टारकास्टमुळं, काही पटकथेमुळं तर काही त्यांच्या दिग्दर्शकांच्या नावांवर प्रसिद्धीझोतात येतात. तर काहींमध्ये ये सर्व घटक एकत्र आल्यामुळं त्या चित्रपटांना कमालीची लोकप्रियता मिळते. असाच एक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ख्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव आहे, Oppenheimer. 

चित्रपटाच्या निमित्तानं नोलन Julius Robert Oppenheimer यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार असून, रुपेरी पडद्यावर त्यांची भूमिका साकारणार आहे अभिनेता Cillian Murphy. ओपेनहायमर नेमके आहेत तरी कोण? त्यांनी असं काय केलं आणि त्यांचा भगवद् गीतेशी नेमका काय संबंध यासंबंधीची माहिती आता आपल्यासमोर टप्प्याटप्प्यानं येताना दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ओपेनहायमर यांच्या एका मुलाखतीमध्ये भगवद् गीतेचा उल्लेख आल्यामुळं सध्या अनेक वर्षांपूर्वीची त्यांची मुलाखतही प्रचंड व्हायरल होत आहे. 

कोण होते ओपेनहायमर? 

Julius Robert Oppenheimer हे बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मॅनहॅटन प्रकल्पाचं नेतृत्त्वं केलं होतं. जिथं, अणुबॉम्बचा शोध, त्याची रचना आणि निर्मिती करत दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी हिरोशिमा, नागासाकी येथे नरसंहार घडवण्यात आला होता. जगभरात ओपेनहायमर यांची ओळख अणुबॉम्बचे जनक म्हणून सांगितली जाते.

हेसुद्धा वाचा : ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण 

 

भगवद् गीतेशी त्यांचं नेमकं नातं काय? 

ज्या अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर मोठा नरसंहार घडू शकतो याची खंत ओपेनहायमर यांच्या मनात सलत होती त्याचवेळी त्यानी अनेक आव्हानांचा सामना केला. त्यावेळी त्यांना Bhagavad Gita या महान हिंदू ग्रथाची मोठी मदत झाली. महाभारताचा संदर्भ असणाऱ्या या गीतेचं सार त्यांनी आपल्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आपल्या प्रत्येक कृतीमागं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. जिथं त्यांनी स्वत:ला अर्जुनाच्या स्थानी ठेवलं. 

नातेवाईक, आपल्या माणसांविरोधातच शस्त्र उचल असं श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तोच संदर्भ ओपेनहायमर यांनी इथं घेतला आणि त्यांनी अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतरच्या मुलाखतीदरम्यान एक लक्षवेधी वक्तव्य केलं, जे जग आजही विसरु शकतेलं नाही. 'आता मी मृत्यू आहे... या जगताचा विनाशर्ता' हेच त्यांचे उदगार. 

अण्वस्त्र हल्ल्यानंतर गीतेचा संदर्भ देत ओपेनहायमर म्हणाले होते, 'आम्हाला ठाऊक होतं, की हे जग आहे तसंच राहणार नाही. काहीजणांनी थट्टा केली, काहीजण रडले, बरेचजण शांत राहिले. मला हिंदू धर्मग्रंथ भगवद् गीतेतील एक वाक्य आठवतं जिथं विष्णूरुपी कृष्ण एका राजकुमाराला (अर्जुनाला) धर्म आणि कर्म निभावण्यात सांगतो.' गीतेचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या ओपेनहायमर यांचा अणुबॉम्बला विरोध होता. रशिया आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये धुमसणाऱ्या आण्विक युद्धाच्या प्रसंगांनाही त्यांनी वेळोवेळी विरोध केल्याचं पाहायला मिळालं. पराभूत जपानवर अणूबॉम्बचा हल्ला न करण्याचा सल्लाही त्यांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांना दिला होता.