धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, विषण्ण करणारी दृश्य समोर

या घडलेल्या प्रकाराने सिनेकलाकारांना धक्का बसला आहे. 

Updated: Aug 11, 2022, 01:03 PM IST
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, विषण्ण करणारी दृश्य समोर  title=

Actor Saibal Chatterjee Suicide Attempt: सिनेसृष्टीत नुकतीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्य यांनी सोमवारी रात्री बंगालमधील कसबा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घडलेल्या प्रकाराने सिनेकलाकारांना धक्का बसला आहे. 

कोलकता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैबल यांनी मद्यावस्थेतच स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. घडल्या प्रकाराचा एक व्हिडीओही स्वतः सैबल यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केला असून या व्हिडीओतील दृश्ये विचलित करणारी आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना ताबडतोब चित्तरंजन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापुर्वी सैबल यांनी सोमवारी रात्री आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपल्या पत्नी व पत्नीच्या कुटुंबाला दोषी ठरवले आहे. सैबल यांनी नैराश्याने घेरले होते. कुटुंबिक त्रासातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. 

सैबल यांनी टेलिव्हिजन तसेच चित्रपटांतून प्रमुख भुमिका निभावल्या आहेत.