डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर

 मराठी नाट्यगृहाची दुरावस्था समस्त नाट्यप्रेमींना आणि कलाकारांना अत्यंत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.

Updated: Jul 21, 2019, 12:56 PM IST
डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर title=

ठाणे : मराठी नाट्यगृहाची दुरावस्था समस्त नाट्यप्रेमींना आणि कलाकारांना अत्यंत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. याचा प्रत्येय डॉ.काशिनाथ घणेकर नाट्यगृहामध्ये आला आहे. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधवने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कलाकारांना मिळत असलेल्या वागणुकीविषयी आणि गैरसोयीविषयी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी वक्तव्य केले आहे.  

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो अतिशय संतापालेल्या अवस्थेत दिसत आहे. नुकताच शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी सुद्धा असा अनुभव अनेक कलाकारांना आला आहे. पैसे पूर्ण घेतात, परंतू सेवा मात्र दुय्यम दर्जेची देतात, असंच काही या नाट्यगृहातील चित्र आहे. 

'असं वाटत आहे, की मी आताच पावसात भिजलोय पण असं काही नाही. नाटकाचा प्रयोग सुरु असताना नाट्यगृहातील एसी बंद आहेत. त्यामुळे पावसात भिजलोय असं तुम्हाला वाटेल. नाटका दरम्यान अनेक वेळा तक्रार केली. मात्र आम्हाला केवळ कारणे देण्यात येत आहेत.' असं भरत या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. 

कलाकारांच्या अनेक तक्रारीनंतर सुद्धा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले नाही. त्यामुळे मराठी नाट्यगृहांना चांगले दिवस कधी येतील, याची वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की...