अभिषेकने शेअर केलेल्या फोटोवर बिग बींनी व्यक्त केली नाराजी

बीग बींनी व्यक्त केली खंत

Updated: Jul 11, 2018, 04:10 PM IST
अभिषेकने शेअर केलेल्या फोटोवर बिग बींनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : अभिषेक बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी एक फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये त्यांचा नातू अगस्त्या आणि नात नव्या नंदा दिसून येत आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये बिग बींची दोन्ही नातवंड फोनमध्ये पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसून येतं आहे. मात्र कुटुंबाबरोबर असताना देखील मोबाईलमध्ये व्यस्त असणं बिग बींना काही फारसं रुचलेलं दिसत नाही. 'जे कुटुंब एकत्र असूनही मोबाईलचा वापर करण्याला प्राधान्य देतात, त्यांच्यासोबत केवळ मोबाईलच राहतो'. असा कॅप्शन देत बिगबी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

... the family that Mobiles together, stays together..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close