हिना खानने शिल्पा शिंदेची 'कॉल गर्ल'सोबत केली तुलना

वादग्रस्त आणि बहुचर्चित अशा 'बिग बॉस' च्या ११व्या सीजनमध्ये विजेता कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याचवेळी घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर जोरदार शाब्दीक हल्ला करण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 11, 2018, 09:11 PM IST
हिना खानने शिल्पा शिंदेची 'कॉल गर्ल'सोबत केली तुलना title=
Image: Instagram

मुंबई : वादग्रस्त आणि बहुचर्चित अशा 'बिग बॉस' च्या ११व्या सीजनमध्ये विजेता कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याचवेळी घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर जोरदार शाब्दीक हल्ला करण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

हिना खान संदर्भात बोलायचं झालं तर, ती दररोज कुठलं ना कुठलं वादग्रस्त वक्तव्य करत असते. आता 'बिग बॉस'च्या घरातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हिना खान शिल्पा शिंदेवर कमेंट करताना दिसत आहे.

अनसीन व्हिडिओ होत आहे व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिनाने शिल्पा शिंदेवर कमेंट केल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडिओत हिनाने शिल्पाची तुलना 'कॉल गर्ल' सोबत केल्याचं दिसत आहे. हिनाने विकाससोबत बोलताना शिल्पासाठी 'कॉल गर्ल' शब्दाचा वापर केला आहे.

हिनाने यापूर्वीही केलयं वादग्रस्त वक्तव्य

हिनाने म्हटलं की, "ती असं बोलते जशी एखादी कॉर्ल गर्ल'. हिनाने वापरलेल्या या अपशब्दांना म्युट करण्यात आलं होतं मात्र, लिप्स रीडिंग पाहून असं वाटतं की, हिनाने 'कॉल गर्ल' शब्दाचा वापर केला आहे. हिनाने असे वादग्रस्त वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाहीये. यापूर्वीही हिनाने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ज्यामुळे शोचा होस्ट अभिनेता सलमान खान याने फटकारलं आहे.

चाहते होऊ शकतात नाराज

बिग बॉसचा एक्स स्पर्धक प्रियांक शर्मानेही शिप्ला शिंदे आणि अर्शी खान यांच्यावर कमेंट केलं होतं. यानंतर सलमान खानने हिनाचा चांगलाच क्लास घेतला होता. आता हिनाने वापरलेल्या अपशब्दांमुळे शिप्ला शिंदेचे चाहते नाराज होऊ शकतात.