तुम्हीही KGF चे फॅन असाल, तर ही बातमी तुमचा दिवस बनवेल...

 साऊथ सुपरस्टार यश यांच्या 'केजीएफ' सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सगळेच वाट पाहत आहेत. 

Updated: Mar 3, 2022, 04:31 PM IST
 तुम्हीही KGF चे फॅन असाल, तर ही बातमी तुमचा दिवस बनवेल... title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार यश यांच्या 'केजीएफ' सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सगळेच वाट पाहत आहेत. कोरोनामुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. नाहीतर हा चित्रपट गेल्या वर्षी 

16 जुलै रोजी प्रदर्शित झाला असता, पण कोविडचा उद्रेक पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली. 

आता यश 14 एप्रिल 2022 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. त्याआधी, संजय दत्तने चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

संजय दत्तने KGF 2 चे एक पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये चित्रपटाचा दुसरा ट्रेलर 27 मार्च रोजी रिलीज होणार असल्याचे समोर आले आहे. 

पोस्टरमध्ये यशचा आक्रमक लूक दिसत असून पोस्टरवर 27 मार्च संध्याकाळी 6 वाजता ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्टरसोबतच संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वादळापूर्वी नेहमी गडगडाट होत असतो! 27 मार्च रोजी #KGFCchapter2 चा ट्रेलर प्रदर्शित होत आहे.