अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; सेलिब्रिटी कपल मोठ्या अडचणीत

या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Updated: Oct 19, 2022, 06:34 PM IST
अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; सेलिब्रिटी कपल मोठ्या अडचणीत title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जे निलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत (Latur MIDC) भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला यासाठी तत्परतेने 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला. आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. 

लातूर एमआयडीसी मध्ये १६ उद्योजकांची प्रतिक्षा यादी असतानाही त्यांना डावलून रितेश आणी जेनेलिया देशमुख यांच्या मे. देश ऍग्रो कंपनीला अवघ्या 10 दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केलाय. याशिवाय लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 116 कोटीचा कर्जपुरवठा अवघ्या काही दिवसात कसा केला असा सवालही यावेळी भाजपानी केला आहे..या कंपनीवर आता लातूर बँकेने ही आक्षेप घेतल्याचं दावाही भाजपने केला आहे. रितेश आणी जेनेलिया यांच्या देश अग्रो या कंपनीसाठी यंत्रणा वेगाने कामाला लागली आणी भूखंड मंजूरीसह कर्ज प्रक्रिया सुध्दा गतीने पार पाडली आसा आरोप भाजपने केला आहे.

 देश ऍग्रो प्रा. ली ही कंपनी 23 मार्च 2021 रोजी स्थापन झाली. या कंपनीमध्ये श्री रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया देशमुख हे 50-50 टक्क्यांचे भागीदार आहेत. स्थापनेवेळी कंपनीचे भागभांडवल 7.50 कोटी रुपये होते.

देशमुख यांना एका महिन्यात १२० कोटींचे कर्ज कसे देण्यात आले? कमी कालावधीत त्यांना कर्ज कसे मिळाले? त्या बँकेने आतापर्यंत किती जणांना कर्ज दिले? याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांना एमआयडीसीमध्ये कोणत्या निकषांच्या आधारे जमीन देण्यात आली आहे? असा प्रश्नही भाजप विचारत आहे. भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर एमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.