हे आहेत 'बिग बॉस ११' चे स्पर्धक

टीव्ही शोज मधील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'.  या शोच्या ११व्या पर्वात कुठल्या सेलिब्रिटीचा समावेश होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही यादी समोर आलीय.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 30, 2017, 11:57 PM IST
हे आहेत 'बिग बॉस ११' चे स्पर्धक  title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : टीव्ही शोज मधील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'.  या शोच्या ११व्या पर्वात कुठल्या सेलिब्रिटीचा समावेश होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही यादी समोर आलीय.

'बिग बॉस ११' लवकरच ऑन-एयर होणार असून यंदाचं पर्वही अभिनेता सलमान खान करणार आहे. पण या शोमध्ये कुणाचा सहभाग असणार आहे याची उत्सुकता अनेकांनी लागली आहे. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 'बिग बॉस ११' मध्ये कुणाचा समावेश होणार आहे.

बॉलिवूड लाइफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्यांची यादी समोर आली आहे. यंदाच्या पर्वाची थीम पडोसी आहे.

यंदाच्या शोमध्येही १५ स्पर्धक असणार आहेत. यामध्ये शिवानी दुर्गा, ज्योती कुमारी, सपना चौधरी, जुबैर खान, टीव्ही फेम हिना खान, शिल्पा शिंदे, बेनफाश शोनवाल्ला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी आणि प्रियांका शर्मा यांचा समावेश आहे.