काळवीट शिकार : सलमान खान दोषी, कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष!

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.

Surendra Gangan Updated: Apr 5, 2018, 12:04 PM IST
काळवीट शिकार : सलमान खान दोषी, कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष! title=

जोधपूर : जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आलेय. आता काय शिक्षा होणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती.

निकालाच्यावेळी सलमान याच्यासह सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे  उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल  करण्यात आला होता.