दिग्दर्शकाने चिडून 'या' अभिनेत्रीचा घेतला होता चावा

'पोस्टर बॉईज' च्या निमित्ताने बॉबी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला. 

Dakshata Thasale Updated: Mar 16, 2018, 02:31 PM IST
दिग्दर्शकाने चिडून 'या' अभिनेत्रीचा घेतला होता चावा title=

मुंबई : 'पोस्टर बॉईज' च्या निमित्ताने बॉबी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला. 

‘रेस3’, ‘हाऊसफुल4’, ‘यमला पगला दिवाना फिर से’ यासारखे सिनेमे आता बॉबी देओलकडे आहेत. या निमित्ताने तो पुन्हा एकदा मीडियाच्या संपर्कात आला. आणि त्याने अनेक जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी एक आठवण शेअर केली आहे. 'करीब' या सिनेमाच्या वेळी दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत केलेला अजब प्रकार. 

दिग्दर्शकाने घेतला अभिनेत्रीचा चावा 

अभिनेत्री नेहाचा हा पहिला सिनेमा होता. आणि बॉबीचा करीब हा दुसरा सिनेमा होता. त्यावेळची बॉबीने आठवण शेअर केली. आणि मोठा खुलासा केला. घाबरलेल्या नेहाशी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी अजब प्रकार केला आहे. नेहा इंडस्ट्रीमध्ये एकदम नवखी होती. त्यामुळे ती प्रचंड नव्हर्स होती. शूटींगदरम्यान एका सीनमध्ये नेहाला पहाडावरून खाली येत स्वत:चा उजवा हात मला द्यायचा होता. पण नेहा प्रचंड कंफ्युज होती. ती वारंवार उजव्याऐवजी स्वत:चा डावा हात मला देत होती. खूप सारे टेक्स् झालेत आणि विधू विनोद चोप्रा संतापलेत.

तू तुझ्या उजव्या हाताला चावा घे, म्हणजे किमान तो हात पुढे करायचा, हे तुझ्या लक्षात राहिल, असे विधू तिला म्हणाले. तिनेही तेच केले. शॉट रेडी झाला. पण नेहाने पुन्हा तीच चूक केली. आता मात्र विधू विनोद चोप्रा जाम संतापले आणि त्यांनी संतापून स्वत:च नेहाच्या उजव्या हाताला चावा घेतला. ते पाहून सगळे अवाक् झालेत. नेहा तर भीतीने कापू लागली. सीन रेडी झाला आणि पण नेहाने तीच चूक पुन्हा केली...तिने पुन्हा तिचा डावा हातचं माझ्यापुढे केला.’ 

कोण आहे नेहा? 

नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. ‘करीब’ हा नेहाचा पहिला सिनेमा. यानंतर ‘होगी प्यार की जीत’,‘फिजा’,‘राहुल’,‘आत्मा’ अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले.